आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुकांसमोर ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या अडचणींचा डोंगर; अर्ज भरण्यासाठी मोजावे लागताहेत पाचशे, हजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिका सभागृहात पाेहोचण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसमोर ऑनलाइन प्रणालीसह विविध प्रमाणपत्रांच्या अडचणींचा जणू डोंगरच उभा असल्याचे दिसून येत आहे. नामांकन प्रक्रिया सुरू झाल्याच्या सहा दिवसांत एकूण १४ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणी तसेच विविध प्रमाणपत्रांचा ससेमिरा असल्याने निवडणुकीच्या रिंगणात अनेक इच्छुक आधीच बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने प्रथमच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून नामांकन अर्ज भरण्याबाबत करण्यात आलेली सुधारणा चांगली आहे. मात्र या संधीचा फायदा घेत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची सायबर कॅफे संचालकांकडून चांगलीच लूट होत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक अर्ज भरुन घेण्यासाठी सायबर कॅफेमध्ये चक्क पाचशे ते हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापासून मोठ्या प्रमाणात पैशाची लयलूट होत असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना पुढील खर्चाचा प्रश्न पडला आहे. शिवाय ऑनलाइन अर्ज भरण्यास अनेक अडचणी येत असल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. 
 
नामांकन दाखल करण्याचे अंतिम दोन दिवस शिल्लक राहिले आहे. ऑनलाइन प्रणालीने उमेदवारी अर्ज सादर केले जाणार असल्याने निवडणूक विभागाच्या सर्वर वर देखील ताण येत असल्याची माहिती आहे. एक उमेदवारी भरण्यासाठी किमान दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. ऑनलाइन अर्ज भरुन धावपळ थांबत नाही तोच विविध प्रमाणपत्रांच्या पूर्ततेचा ससेमीरा उमेदवारांच्या मागे लागत आहे. निवडणूक अर्ज भरतानाच विविध प्रमाणपत्र तसेच बँक खाते काढण्याची पावती देखील मागितली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत विविध प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आल्याने अनेक इच्छुकांना प्रचार आरंभ होण्यापूर्वीच घाम फुटल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या चार सदस्यीय प्रणालीत २२ प्रभागातून एकूण ८७ जागांसाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. २२ पैकी २१ प्रभागात तर क्रमांकाच्या एका प्रभागात सदस्यांचा समावेश राहणार आहे. फेब्रुवारीला अर्ज भरण्याची प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. 

सहाव्या दिवशी आले १२ उमेदवारी अर्ज 
मनपासाठीसहा दिवसांत एकूण १४ जणांनी उमेदवारी दाखल करण्यात आले. सहाव्या दिवशी फेब्रुवारीला १२ नामांकन तर यापूर्वी दोन नामांकन भरण्यात आले. झोन क्रमांक मध्ये ५, झोन मध्ये ३, झोन मध्ये २, झोन मध्ये असे १२ नामांकन दाखल झाले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये बाबाराव गायकवाड, अण्णा गवई, योगीता पाटील, उपेंद्र पाटील, धीरज हिवसे, गिता कुर्मी, संतोष डोईफोडे, किरण पाटील, सुरेश तायडे, प्रिया भगत, सविता टेंभुर्णे आदी उमेदवारांचा समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...