आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगल सफारी झाली महाग, ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना मोजावे लागणार जास्त सेवा शुल्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नागपूर- राज्य सरकारने आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे अन्य अभयारण्यांसाठीही आता ऑनलाइन बुकिंग सुरु केली आहे. हे करतानाच ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांच्या सेवा शुल्कात 42 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता जंगल सफरी करणे महाग झाले आहे.
 
या पावसाळ्यात ताडोबा, पेंच आणि अन्य राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीवर बंदी घालण्यात आली आहे. आता 15 ऑक्टोबरनंतरच हे व्याघ्र प्रकल्प फिरण्यासाठी सुरु होणार आहेत. यावेळी ऑनलाइन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 
 
पहिल्यादा ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना प्रत्येक तिकिटाकरिता 35 रुपये सेवा शुल्क द्यावे लागत होते. आता त्यात 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता ऑनलाइन बुकिंग करताना 50 रुपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.
 
यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सफारीसाठी आतापासून ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. 
 
या अभयारण्यांच्या जंगल सफारीचे करता येणार ऑनलाइन बुकिंग
रात्री 12 वाजता सुरु होणारे ऑनलाइन बुकिंग आता सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट, नवेगांव-नागझिरा, सहयाद्री या व्याघ्र प्रकल्पांप्रमाणेच टीपेश्वर, उमरेड-करांडला, मान सिंह देव, राधानगरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमवेत 47 अभयारण्याचे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...