आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण पाचवी; क्राइममध्ये मात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडवरून आणलेल्या आरोपीसोबत राजापेठ ठाण्याचे पोलिस.
अमरावती- शिक्षणजेमतेम पाचवीपर्यंत झालेले आहे. संगणकाचेही परिपूर्ण ज्ञान नाही. मात्र, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मागील अनेक महिन्यांपासून देशभरातील अनेक बँक ग्राहकांना गंडा घालण्यात त्या टोळीला यश आले आले आहे. बँक अधिकारी बोलत असल्याचे भासवून ग्राहकांच्या बँक खात्यातून रक्कम काढायची त्याद्वारे आर्थिक लूट करण्याचा त्यांचा व्यवसायच झाला आहे. अशाच टोळीतील एकाला राजापेठ पोलिसांनी सध्या झारखंडमधून अटक करून शहरात आणले आहे.
अन्सारी उर्फ उल्फत मनिज उर्फ मॅनेजर मिया (३०), असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. उल्फत हा गवंडी काम करतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून गवंडी कामासोबतच त्याने सायबर क्राइम करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या काही मित्रांसमवेत त्याने बँक ग्राहकांच्या खात्यातून रक्कम ऑनलाइन वळण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. शहरातील संतोष सोहनलाल गुप्ता (३९, रा. रविनगर) यांच्या खात्यातून ऑगस्ट २०१५ ला ६४ हजार ४२७ रुपयांची रक्कम परस्पर काढली होती. सदर प्रकार लक्षात येताच गुप्ता यांनी ऑगस्टला राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशाप्रकारचे ५० च्या वर गुन्हे मागील दहा महिन्यांत शहरात घडले आहे. प्रत्येक गुन्ह्यांमध्ये आरोपींची पद्धती ही सारखीच आहे. गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता उल्फतचे नाव पुढे आले. त्याला पकडण्यासाठी राजापेठचे पोलिस झारखंडमध्ये गेले त्या ठिकाणाहून त्याला अटक केली. याच वेळी त्याच्या घरात ८८ हजार ९०० रुपये मिळाले आहे.

आम्ही झारखंडमधून एकाला अटक करून ८८ हजार ९०० रुपये जप्त केले आहे. याच्यासोबत अजूनही काही आरोपी आहेत का? शहरातील आणखी काही बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे का? ही माहिती घेणार आहे. जेमतेम पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उल्फतचा सायबर क्राइममधील सहभाग आमच्यासाठीही धक्कादायकच आहे. रवीराठोड, एपीआय, राजापेठ.