आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा परताव्याच्या नावाखाली प्रथमच आॅनलाइन फसवणूक- तपास सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आम्ही विमा कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयातून बोलत असून, तुमचा विमा बंद पडला आहे, तो सुरू करण्यासाठी दिलेल्या खाते क्रमांकावर लाख ४६ हजार रुपयांचा भरणा करा,त्यानंतर तुम्हाला विमा परताव्याचे १० लाख २० हजार रुपये मिळतील, असे सांगून भामट्यांनी शहरातील एका निवृत्त नोंदणी उपमहानिरीक्षकांना आॅनलाइन फसवल्याचे शहर पोलिसांमधील पहिलेच प्रकरण समोर आले आहे. प्रकाश विश्वासराव ठाकरे (६५ रा. पूजा कॉलनी, अमरावती) असे फसगत झालेल्या निवृत्त नोंदणी उपमहानिरीक्षकांचे नाव आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सोमवारी (दि. २०) आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

प्रकाश ठाकरे हे २०१० मध्ये नोंदणी उपमहानिरीक्षक पदावरून नागपूर येथून निवृत्त झाले आहे. त्याच वर्षी त्यांनी एका कार्पोरेट कंपनीकडून २० लाखांचा विमा उतरवला होता. या विम्याची पद्धत मनीबॅक होती. या विम्याचा ठाकरे यांना प्रतिवर्ष ९९ हजार ९९९ रुपये हप्ता होता. ही रक्कम तीन वर्ष भरल्यानंतर हप्ता भरण्याची गरज नव्हती. कारण मनीबॅक असल्यामुळे त्यामधूनच हप्ता भरल्या जाणार होता. दरम्यान, ठाकरे यांनी २०१३ पर्यंत हप्ता भरला त्यानंतर हप्ते भरणे बंद केले. दरम्यान २०१३ पासून त्यांना अधूनमधून विमा बंद पडल्याबाबत सांगण्यासाठी फोन येत होते. मात्र, १० मे २०१६ ला त्यांना फोन आला, त्या वेळी फोनवर बोलणाऱ्या महिलेने आयआरडीएच्या मुख्य कार्यालयातून शालिनी मिश्रा बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही घेतलेला विमा २०१३ पासून बंद पडला आहे. याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या एजंटद्वारे विमा उतरवला होता, त्यानेच तुम्हाला फसवले आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही, आम्ही वरिष्ठ कार्यालयातून विशेष प्रयत्नाद्वारे तुम्हाला संपूर्ण रक्कम परत करणार आहे. यासाठी आम्हाला ४५ दिवसांचा अवधी लागणार आहे. या ४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या कंपनीकडून विमा उतरवला आहे, त्या कंपनीच्या स्थानिक कार्यालयात जाऊन कोणतीही चौकशी करू नका. या महिलेने ठाकरे यांची विमासंदर्भात संपूर्ण माहिती तंतोतंत खरी सांगितल्यामुळे ठाकरे यांचा विश्वास बसला. दरम्यान, यासाठी आम्हाला सर्वप्रथम ‘एजंट कोड’ बदलावा लागणार आहे. यासाठी तुम्ही ‘येस ट्रेड्स सर्व्हिसेस’ नामक फर्मच्या खाते क्रमांकावर ३२ हजार ७०० रुपये पाठवा. त्यामुळे ठाकरे यांनी १२ मे रोजी या रकमेचा बँकेत भरणा केला. त्यानंतर तीन दिवसांनी हैदराबादवरून शांतीबहन विश्वकर्मा बोलत असल्याचे सांगून दुसरा फोन आला. आपण भरणा केलेली रक्कम आम्हाला मिळाली असल्याचे सांगून एजंट कोड बदलवण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर १९ मे २०१६ ला अग्निहोत्री नामक व्यक्ती बोलत असल्याचे सांगून तिसरा फोन आला. त्याने ठाकरेंना सांगितले की, तुम्हाला पैसे देण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण झाली असून, तुम्हाला लवकरच लाख ५० हजार तसेच लाख ७० हजार रुपये पेनॉल्टी अप्रुव्हड व्हॅल्यूचे असे एकूण १० लाख २० हजार रुपये मिळतील. दरम्यान, यासाठी तुम्हाला लाख १४ हजार रुपये तातडीने भरणा करावे लागतील. ठाकरे यांनी लाख १४ हजारांची रक्कम २० मे २०१६ ला बँकेत भरणा केली. दरम्यान, १६ जून २०१६ ला ठाकरे यांना आर. के. बतरा नामक व्यक्ती आयकर कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला ११ लाख ६६ हजार रुपये मिळणार असून, त्यासाठी आयकर भरणा करावा लागणार असून, ही रक्कम लाख ६२ हजार २५० रुपये एवढी आहे.

यातही ही रक्कम १७ जून २०१६ ला दुपारी वाजण्यापूर्वी भरायची आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आता मात्र ठाकरे यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी या रकमेचा भरणा केला नाही. मात्र, तत्पूर्वी दोन वेळा ३२ हजार ७०० रुपये आणि लाख १४ हजार रुपये असे एकूण लाख ४६ हजार ७०० रुपये भरणा करून फसवणूक झालेली आहे.
- विमा, बोनस, एजंट कोड बदलवण्याबाबत कोणतीही माहिती किंवा सूचना मोबाइलवरून देत नाही.
- अनोळखी फोन क्रमांकावरून कोणतीही माहिती देऊ नये, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पीआय गणेश अणे यांनी सांगितले आहे.
- कोणतीही विमा कंपनी किंवा आयआरडीएकडून (विमा कंपनीवर नियंत्रण ठेवणाऱ्या ) ग्राहकांना मोबाइल क्रमांकावरून फोन येत नाही.
- विमा कंपनी किंवा आयआरडीए ग्राहकांना कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही.

फसवणुकीचा गुन्हा केला दाखल
शहरातील निवृत्तनोंदणी उपमहानिरीक्षक प्रकाश ठाकरे यांच्या तक्रारीवरून आम्ही पाच ते सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्यामुळे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात येणार आहे. प्रमेश आत्राम, ठाणेदार,फ्रेजरपुरा.

उत्तर प्रदेशातून आले ठाकरे यांना कॉल
आतापर्यंत अशा फेक कॉलवरून बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाइन खरेदी करून फसवणूक केल्याचे अनेक प्रकरण मागील काही वर्षांत उघड झाले आहे. मात्र, विमाधारकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. ठाकरे यांना आलेले कॉल हे उत्तर प्रदेशातील एका गावातून आले असल्याचे पुढे आले आहे.
बातम्या आणखी आहेत...