आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख 62 हजारांनी ऑनलाइन फसवणूक, 8 नागरिकांची एका दिवसांत केली फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल आठ नागरीकांची एकाच दिवसात लाख ६२ हजार ४८९ रुपयांनी फसवणूक झाल्याची घटना गुरूवारी (दि. ३१) घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपिविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
फसगत झालेल्यांमध्ये अरविंद बापुराव मेहरे रा. संमती कॉलनी, यांचे ४५ हजार ९८९ रुपये, केवल कॉलनीमधील एका महीलेचे हजार ५०० रुपये, अविनाश दामोदरराव गायकवाड यांचे ४५ हजार रुपये, सैय्यद खान यांचे पाच हजार, हिंमत बावने यांचे एक हजार, अक्षय शरद घोरमाडे (२५ समर्पण कॉलनी) यांचे ४३ हजार रुपये, प्रतिक श्रीकांत देशमुख (रा. राठीनगर) यांचे पाच हजार रुपये असे एकूण लाख ६२ हजार ४८९ रुपये अज्ञात भामट्याने ऑनलाइन पद्धतीने लुबाडले आहे. या सर्वांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. कुणाला सांगितले कि, कार्ड ब्लॉक झाले, कुणाला सांगितले खात्यासोबत आधार लिंक करायचे आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने बतावणी करून काहींना ओटीपीसुद्धा मागितला. याच ओटीपीच्या आधारे त्यांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास केली आहे. या फसवणूक प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आात आरोपिविरूद्ध गुरूवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला आहे. 
 
धमकी देवून लाख ५५ हजारांनी फसवणूक 
शहरातीलअसीर कॉलनीमध्ये राहणाऱ्या तनवीर बेग फिरोज बेग (३५) यांना राम अवतार सिंग वेगवेगळ्या नावाच्या चार महिलांचा फोन आला. जुलै २०१७ पासून हे अनोळखी व्यक्ती तनवीर यांना फोन करून तुम्हाला विम्याची मोठी रक्कम मिळणार आहे. ती पाहिजे असल्यास काही रक्कम आम्ही सांगतो त्या खात्यात जमा करा, असे सांगायचे. त्यामुळे तनविर बेग यांनी लाख ५५ हजारांची रक्मम त्या खात्यात टाकली. मात्र त्यांना रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गुरूवारी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...