अमरावती- शहरातील रविकिरण कॉलनीमध्ये राहणाऱ्या सदानंद विष्णुपंत मोहरील (४९) यांनी ऑनलाईन नोकरीसाठी ‘अप्लाय’ केला असता श्रध्दा बोष नावाच्या महिलेने सांगितले, कि तुम्हाला नोकरी मिळाली आहे. तुम्हाला एक फोन येईल, त्या सुचना देणार आहे. त्या फोनवरून आणखी एका महिलेने मोहरील यांना वेगवेगळ्या वेळी एकूण २८ हजार ८५० रुपये भरणा करण्यास सांगितले. त्यांनी रक्कम भरली मात्र नोकरी मिळाली नाही. फसगत झाल्याचे लक्षात येताच मोहरील यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी (दि. ६) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.