आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला हृदय व लिव्हर दान करण्यासाठी प्रतीक्षा करत होती आई, पण एअर अॅम्बुलन्स आली नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर शहरात २४ वर्षांच्या तरुणाचा अपघात झाला. त्याचे ब्रेन डेड झाले असून इतर अवयव काम करत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या दु:खातही स्वत:ला सावरत त्याच्या आईने मुलाचे हृदय, मूत्रपिंड, लिव्हर, डोळे अनोळखी गरजूंना दान करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील ट्रान्सप्लांट को-आर्डिनेशन सेंटरला याची सूचना देऊन एअर अॅम्ब्युलन्स पाठवण्यास सांगण्यात आले. तेथे दोन रुग्णांना अवयव देण्याची तयारीही झाली. परंतु १२ तास प्रतीक्षा करूनही अॅम्ब्युलन्स नागपुरात आलीच नाही आणि त्या तरुणाचे सर्व अवयव खराब झाले. अवयव घेणाऱ्या संस्थेने निर्णय घेण्यास उशीर केल्याने हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या घटनेला दोन महिने झाले असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती मागवली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या सचिनचे यकृत आणि हृदयाचे प्रत्यारोपण करण्यासाठी मुंबईतील विभागीय ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरला सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी हृदय आणि यकृत हव्या असलेल्या दोन रुग्णांच्या नावांची निश्चिती केली.

त्यारोपणाची तयारी झाली. मुंबईहून त्याचे नियाेजन करण्यात अाले. त्यानुसार, एअर अॅम्ब्युलन्स २० ऑगस्टला सकाळी वाजता नागपुरात येणार हाेती. मात्र १९ तारखेलाच सचिनची प्रकृती बिघडत गेली. डॉक्टरांनी किडनी आणि डोळे तत्काळ काढण्याचा निर्णय घेतला. प्रतीक्षा करूनही एअर अॅम्ब्युलन्स आली नाही. १२ तासांनी मुंबईच्या संस्थेने अॅम्ब्युलन्सची व्यवस्था झाली नसल्याचे सांगून हात वर केले. सचिनची अाई मात्र आपल्या मुलाचे अवयव दान करता यावे म्हणून वाटच पाहात हाेती.

मुंबईतील विभागीय ट्रान्सप्लांट को- ऑर्डिनेशन सेंटरचे राहुल वासनिक म्हणाले की, ‘आम्ही एअर अॅम्ब्युलन्स नागपूरला पाठवण्यासाठी सांगितले होते. शेवटच्या क्षणी आम्हाला कळाले की, एअर अॅम्ब्युलन्स येणार नाही. १२ तासांनंतर विमान भेटले पण ताेपर्यंत सचिनचे अवयव खराब झाले होते.’

सचिनच्या वडिलांनाही मूत्रपिंडाची गरज
सचिनच्या वडिलांना नऊ वर्षांपासून मूत्रपिंडाची गरज आहे. ते डायलिसिसवर आहेत. अनेकदा प्रयत्न केले, पण प्रत्यारोपण झाले नाही. भाचा प्रकाशचेही मूत्रपिंड खराब झाले आहे. परंतु सचिनचा ग्रुप त्यांना मॅच झाला नाही. ‘मी तुम्हाला माझे मूत्रपिंड देतो’, असे सचिन वडिलांना म्हणायचा. पण वडिलांच्या आधीच तो गेला.
बातम्या आणखी आहेत...