आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदींचा धान शेतीचा प्रयोग यशस्वीतेच्या मार्गावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कापूस,सोयाबीन, तूर, मुग, उडीद हीच अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पिके म्हणून सर्वांना परिचित आहेत. मेळघाटात किरकोळ भागात धानाचे उत्पादन घेतले जाते. परंतु मैदानी प्रदेशातही जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदींनी धानाचा प्रयोग करून नवीन पर्यायी मार्ग दाखवला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुबलक सिंचनाची साेय असलेल्या जमिनीत धानाचे पीक घेतले जाण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

अमरावती मध्यवर्ती कारागृहाला लागूनच कारागृहाचे २१ एकर शेत आहे. या २१ पैकी एकर शेत हे पडीक आहे, मात्र उर्वरित १३ एकर शेतात प्रशासनाच्या मदतीने कारागृहातील बंदी स्वत: राबून वेगवेगळे पीक घेतात. यावर्षी कारागृहातील बंदींनी पहिल्यांदाच १३ एकरांपैकी एकर शेतात धानाची लागवड केली आहे. लवकरच या धानाचे पीक बाहेर येणार आहे. अमरावती खुल्या कारागृहात ४७ बंदी कार्यरत आहे. हे बंदी शेतीकाम करतात. कारागृहाजवळ असलेली शेती चांगल्या पद्धतीने केली तर समाधानकारक उत्पन्न मिळू शकते. यापूर्वीसुद्धा कारागृहातील शेतातून कारागृह प्रशासनाच्या मदतीने बंदींनी भाजीपाला इतर पीक घेतले आहे. तसेच प्रात्यक्षिक म्हणून काही वर्षांपूर्वी अर्धा गुंठा क्षेत्रफळात धान लावले होते. मात्र पीक म्हणून कारागृह प्रशासनाने यंदा खरिपात धानाची तीन एकरामध्ये लागवड केली.

वास्तविक अमरावती जिल्ह्यातील जमिनीमध्ये धान शेती सहजासहजी केली जात नाही. (मेळघाटातील काही अपवादात्मक भाग) मात्र कारागृहातील बंदींनी यावर्षी थेट धान शेतीचा प्रयोग केला आहे. तीन महिन्यांपूर्वी भाताची लागवड केली आहे. धान पीक सद्या लोंबीने बहरले आहे. त्यामुळे आगामी एक महिन्यात ते काढणीसाठी येणार आहे. कारागृहाच्या शेतीमध्ये होणारा हा प्रयोग जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

समाधानकारक उत्पन्न होण्याची शक्यता
आम्ही यावर्षी पहिल्यांदा धान शेती करत आहे. एकरमध्ये धान असून सद्या धानाचे पिक लोंबीने बहरले आहे. एकरामध्ये असलेल्या धानाला पुरशे सिंचन करता यावेत यासाठी शेततळे विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. पहिल्याच वर्षी प्रयोग म्हणून केलेल्या धानाचे समाधानकारक उत्पन्न हाेण्याची शक्यता आहे. या शेतीसाठी आमचे कर्मचारी, बंदी राबताहेत. डाॅ.भाईदास ढोले, कारागृह अधीक्षक, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...