आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रसंतांच्या पालखीला बसणार ‘झटके’, वर्षभरापासून रखडली आहे निविदा प्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - मोझरी विकास आराखड्याअंतर्गंत गावात मोठ्या इमारतींसह कोट्यावधीची कामे झाली आहेत. परंतु याच आकर्षक इमारतींसमोरून महाराजांच्या पालखीची परिक्रमा होणाऱ्या सुमारे दोन किमी लांबीच्या रस्त्याची निविदा प्रक्रिया वर्षभरापासून रखडली अाहे. त्यामुळे गावाचा विकासच केंद्रबिंदू मानून आयुष्य खर्ची घातलेल्या राष्ट्रसंतांच्या पालखीला यावर्षी पुण्यतिथी महोत्सवात रस्त्यावरील खड्ड्यामुळे ‘झटके’ खावे लागणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखड्याअंतर्गंत मोझरी येथे कोट्यावधी रुपयांची अनेक विकासकामे झाली आहेत. भव्य प्रशस्त इमारती उभ्या झाल्या आहेत. परंतु काही रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने झालेल्या विकासकामांची खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे ‘शान’ जात असल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून उमटत आहेत. मोझरी विकास आराखडा मधील विकास कामाचा एक भाग म्हणुन खोडके यांच्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंतचा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. या मार्ग महाराजांच्या पालखीचा परिक्रमेचा प्रमुख रस्ता आहे. सध्या या मार्गाची वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. गावातील हा प्रमुख मार्ग असल्याने यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेली गिट्टी, कॉंक्रीटमुळे या दोन किमी रस्त्याची भयावह अवस्था झाली आहे. गावावर दुरून नजर टाकली की विकास आराखड्याअंतर्गंत उभ्या झालेल्या मोठमोठया इमारती दिसतात. परंतु या मार्गाने या इमारतीचे सौंदर्य न्याहाळले तर ठेच लागून डोके फोडून घेण्याची पाळी नागरिकांवर येण्याची अवस्था निर्माण झाली आहे. काही वर्षांपुर्वी जिल्हा परिषद निधीतुन या रस्त्याचे नुतनिकरन करण्यात आले होते. परंतु नित्यनेमाप्रमाणे निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने हा मार्गाची काही दिवसातच वाट लागली. महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव उद्यापासून (दि. १४) सुरू होत आहे. यानिमित्त गावात भाविकांची मांदियाळी असते.

तांत्रिक मुद्द्यात अडकल्या निविदा
^मी परवाना आयुक्तांशी बोलली. ते म्हणाले आम्ही टेंडरिंग केले होते. ज्यां तिघांनी निविदा भरल्या होत्या त्या मंजूर झाल्या नाही. तांत्रिक अडचणींमुळे निविदा मंजूर होऊ शकल्या नाही. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया कराव्या लागणार आहे. -अॅड. यशोमती ठाकूर , आमदार, तिवसा.

पालखीचा रस्ता का होऊ शकला नाही?
गावाचा विकासच केंद्रबिंदू मानून आयुष्य खर्ची घातलेल्या राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात भाविकांना एकीकडे इमारतींच्या रुपात विकासाच्या खाणाखुणा दिसत असल्या तरी पायाखालच्या या रस्त्याची दारूण अवस्था पाहून हा रस्ता का होऊ शकला नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच उभा ठाकणार आहे.

गावकऱ्यांनीच बुजविले खड्डे
राष्ट्र संताचा पुण्यतिथी महोत्सव असल्याने येणाऱ्या पाहुण्यांना पालखीच्या मार्गावरील दारिद्र पाहुण्यांना दिसू नये म्हणून खड्डे बुजवण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. आपल्या घरासमोरील खड्डे बुजवण्यासाठी काही ठिकाणी नागरिकांनी पदरमोड करून या खड्ड्यांमध्ये मुरूम, माती टाकून डागडूजी केली आहे.

निविदा काढण्याचे काम सुरू आहे
^शासन निर्णयानुसार यामार्गासाठी १५ फेब्रुवारी २०१५ रोजी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्या रद्द झाल्या. त्यानंतर मागील वर्षी निविदा धारक मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू आहे. -हर्षद चौधरी, प्रकल्प अधिकारी, मोझरी विकास आराखडा
राष्ट्रसंतांची पालखी परिक्रमा करणाऱ्या मार्गाची सध्या अशी भीषण अवस्था झाली आहे.
मोझरी विकास आराखड्याअंतर्गंत भक्तनिवास, सभागृह आदी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...