आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनकार्ड क्लब्सची विदेशातही मालमत्ता, आर्थिक गुन्हे शाखेकडून खाते गोठवण्यासाठी प्रक्रिया सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुंतवलेली रक्कम काही गुंतवणूकदारांना ठराविक मुदतीत परत मिळाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या शहरातील पॅनकार्ड क्लब्सच्या देशातील बारा राज्यांसह पाच देशातही मालमत्ता असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीमध्ये पुढे आली आहे. दरम्यान, राज्यात असलेल्या सर्व मालमत्तेचे दस्ताऐवज मिळवण्यासाठी खाते गोठविण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे.
 
जिल्ह्यातील जवळपास ६० हजार गुंतवणूकदारांनी पॅनकार्ड क्लब्समध्ये तब्बल २० कोटी रुपये गुंतवल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती वर्तवला आहे. आतापर्यंत पोलिसांकडे दहा गुंतवणूकदारांनी तक्रार दिली आहे. पॅनकार्ड क्लब्सचे संचालक शोभा रत्नाकर बोरडे (बोरीवली, मुंबई), उषा अरुण ताटी (रा. माहीम), सुधीर शंकर मोरावेकर (रा. प्रभादेवी), चंद्रसेन गणपतराव भिसे (रा. सायन), मनिष कालीदास गांधी (रा. वसई, ठाणे) आणि रामचंद्रन रामक्रिष्णन (रा. मालाड) आहेत. या प्रत्येक संचालकांनी स्वत:च्या नावे वेगवेगळ्या कंपणी सुरू केल्या आहेत. यामध्ये रामचंद्रण रामक्रिष्णन यांच्या १६, शोभा बाेरडे ११, सुधीर मारोवेकर १३, मनीष गांधी १६, उषा तारींच्या २० आणि चंद्रसेन भिसेची अशा या कंपण्या आहेत. 

दरम्यान सेबीने पॅनकार्ड क्लब्सच्या संचालकांना २९ फेब्रुवारी २०१६ ला संबधित व्यवसाय बंद करून गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते तसेच यापुढे नवीन कोणत्याही योजना सुरू करू नका असेही सांगितले होते.  
 
मात्र तरीही कंपनीने न्यु रिलॅक्स न्यु डिलाईट नावाच्या दोन योजना सुरू केल्या होत्या. पॅनकार्ड क्लब्सच्या राज्यासह राज्याच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता आहेत. त्यामुळे शनिवारी (दि. ७) आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी राज्याच्या मुद्रांक महानिरीक्षकांना पत्र पाठवून उघड झालेल्या राज्यातील मालमत्तेचे दस्ताऐवज तपासासाठी मागवले आहे. 

याठिकाणी आहेत मालमत्ता 
महाराष्ट्रामध्येशिर्डी, मालवण, पनवेल, महाबळेश्वर, पुणे, पेंच, कान्हा अभयारण्य, ताडोबा. राजस्थान मधील तोडगड, उदयपूर तसेच गुजरातमधील गीर अभयारण्य. पश्चिम बंगालमधील मंदारमुनी, आसाममधील काजीरंगा, हीमाचल प्रदेशमधील चैल, दिल्लीतील गुरगाव, उत्तराखंडमधील न्यु टेहरी, भिमतल, कोरवेळ तसेच तेलंगणामधील हैद्राबाद, तामिळनाडूमधील मैसूर, कोलाम, कोडाईकनाल, उटी तसेच केरळमधील अल्लेप्पी आणि गोवा याठिकाणी मालमत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्यतिरीक्त देशात सद्यास्थितीत १२ नविन प्रोजेक्टचे काम सुरू आहे. 

विदेशामध्येही पसरला व्याप: युएसएमधीलनाॅर्थ कॉरनिला, न्युयॉर्क, लाँसवेगास, अोरलॅन्डो, सिंगापूर, दुबई, बँकाँग आणि पटाया या देशातही मालमत्ता असल्याचे पुढे आले आहे. या क्लब्सचे देशात तब्बल २६ लाखांच्या आसपास गुंतवणूकदार असून त्यांनी हजारापेक्षा जास्त गुंतवणूूक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

मालमत्तेचे दस्ताऐवज मागवले आहे 
पॅनकार्डक्लबची देशातील बारा राज्यांसह पाच देशांमध्ये विविध मालमत्ता असल्याचे पुढे आले आहे. मालमत्तेचे दस्ताऐवज तपासण्यासाठी मुंद्राक महानिरीक्षकांना पत्रव्यवहार केला आहे - गणेश अणे, पीआय, आर्थिक गुन्हे शाखा. 
बातम्या आणखी आहेत...