आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण महिला बचतगटांनाही मिळणार आता ‘आपुलकी’ची साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यासह संपूर्ण अमरावती विभागातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांना सढळ हाताने मदत करणारी ‘आपुलकी’ आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांसोबतच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मदत करण्यासाठी सरसावली आहे. सक्षम पारदर्शक व्यवहार असलेल्या निवडक बचतगटांना आपुलकी पुढील काळात व्यवसायासाठी भक्कम मदत करणार आहे.
आर्थिक बचतीचा मुख्य गाभा असलेल्या नारीशक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपुलकीने सक्षम पारदर्शक महिला बचत गटांना सामूहिक उद्योगाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. त्याची सुरवात जिल्हातील राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद या गावातून प्रकाश साबळे,अभिजीत फाळके, मिलिंद फाळके, पंकज देशमुख, शशिकांत बोंडे यांनी पुढाकर घेऊन सुरू केला आहे. आपुलकीने बँक पंचायत समितीच्या मदतीने जिल्ह्यातील ३३२ सक्षम पारदर्शक महिला बचतगट निवडले आहे. पहिल्या टप्प्यात या ३३२ बचत गटातीलच प्रत्येक तालुक्यातील पाच पारदर्शक सक्षम महिला बचत गटांना आपुलकीने मदतीसाठी तयारी केली आहे. या बचत गटातील महिलांना सामूहिक उद्योगासाठी त्यामध्ये (सामूहिक दालमिल, शेळी व्यवसाय, सामूहिक शेती, दळण केंद्र इत्यादी) अर्थसाहाय्य देणे विचाराधिन आहे.
निराधारकुटूंबाला दिली पीठगिरणी: राष्ट्रसंततुकडोजी महाराजांची जन्मभूमी यावली येथे रविवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी बाळासाहेब डहाके यांच्या पत्नी जयश्री डहाके यांना आपुलकीकडून पीठगिरणी भेट देण्यात आली. यावेळी आपुलकीचे पदाधिकारी, आमदार यशोमती ठाकूर इतर मान्यवर उपस्थित होते. याचवेळी डहाके कुटूंबाला अमरावती कृउबासकडून १० हजार रुपये तर अमरावती खविसंकडून हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सामूहिक उद्योगाचे जाळे तयार व्हावे
^ग्रामीण भागात सामूहिक उद्योगाचे जाळे तयार व्हावे, महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करणे.राष्ट्रसंताच्या जन्मभूमीत महिला जागृती अभियानाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला आहे. प्रकाशसाबळे, आपुलकी.
पीठगिरणी भेट देताना आपुलकीचे पदाधिकारी इतर मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...