आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋणानुबंध- मातृपितृ पूजनाने पाणावले पालकांसह विद्यार्थ्यांचे डोळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मातृपितृ पूजनप्रसंगी पालकांना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले झाले होते. - Divya Marathi
मातृपितृ पूजनप्रसंगी पालकांना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले झाले होते.
अमरावती - आईवडील हे मुलांचे पहिले गुरू असतात. त्यांचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असते. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना आईवडिलांचे महत्त्व कळावे म्हणून शहरातील विविध शाळांमध्ये मातृपितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री योग वेदांत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आईवडिलांची महती विशद केली. या वेळी विद्यार्थ्यांनी आईवडिलांची पूजा करून आशीर्वाद घेतले. हा हृदयस्पर्शी प्रसंग शाळेतील शिक्षकासह विद्यार्थी पालकांनी डोळ्यात साठवला. 

शारदाकन्या विद्यालय 
शारदानगर येथील शारदा कन्या विद्यालयात श्री योग वेदांत सेवा समितीद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पूजेचा विधी बाल संस्कार विभागाच्या प्रभारींनी पार पाडला. विद्यार्थ्यांनी मातापित्याचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी मुख्याध्यापिका रघुवंशी यांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक करुन आईवडिलांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला दिव्या मोहोड, प्रेरणा मानेकर, पल्लवी भांडे, श्रावणी हिरुळकर, गौरी नानवटे, अर्पिता हाते, भूमिका परिहार, कल्याणी देवतळे, चंचल आडे, वीणा पवार, साक्षी देशमुख, ईश्वरी वानखडे, देवयानी काळपांडे, कशिश कोठार, तन्मयी खारकर, शिवानी भोकरी, निकिता बांडबुचे आदी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. 

मनपा शाळा क्रमांक 
महानगरपालिकेच्या मराठी शाळा क्र. मध्ये मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षिका विजया खुळे यांनी पूजेची पद्धत वेगवेगळी असली तरी प्रेम आणि आदरभाव सर्व धर्मात सारखाच असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका वंदना सावजी यांनी श्री योग वेदांत समितीचे आभार मानले. मनपा शाळेच्या हिंदी प्राथमिक शाळा क्र. ११, भाजी बाजार येथील शाळा क्र. तसचे बुधवारा येथील मराठी मुलींचे हायस्कूल क्र. मध्येही हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी मुख्याध्यापक गोपाल कांबळे, मुख्याध्यापिका संुगीता कुकडे, प्रतिभा देशमुख यांचे सहकार्य लाभले. 

अस्मिताविद्या मंदिर 
पन्नालालनगर स्थित अस्मिता विद्यामंदिर येथे मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. 

नारायणदास लढ्ढा हायस्कूल: श्री योग वेदांत समितीतर्फे नारायणदास लढ्ढा हायस्कूलमध्ये मातृपितृ पूजन करण्यात आले. समितीच्या बाल संस्कार विभागाच्या प्रभारींनी मुलांमध्ये संस्कार रुजवणाऱ्या मात्यापित्याची महिमा कथन केली . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्यामची आई या पुस्तकातील काही प्रसंग कथन केले. प्राचार्या झंवर यांनी प्रेमदिनी, १४ फेब्रुवारी रोजी आईवडिलांची घरी पूजा करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी सिद्धिका वानखडे, भाग्यश्री घोरमाडे, मुकूल बुल, चार्वाक भेँडे, सिद्धी भुयार, समिक्षा कावळे, अंशुमन उपाध्याय या विद्यार्थ्यांसह हिमांशू उपाध्याय या पालकानेही मत व्यक्त केले. 

 
बातम्या आणखी आहेत...