आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये लवकरच ‘मल्टिलेव्हल पार्किंग’, पार्किंगमध्ये राहील ३०० चारचाकी वाहनांची सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चारचाकीवाहन पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने “मल्टिलेव्हल पार्किंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, २५ जून रोजी सकाळी मनपा आयुक्त पदाधिकाऱ्यांनी टाऊन हॉललगत गांधी चौकात दोन जागांची पाहणी केली. या वेळी दोन्ही ठिकाणी एकूण ३०० चारचाकी वाहनांचे “मल्टिलेव्हल पार्किंग’ तयार होऊ शकते, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी सांगितले.
मुख्य शहरात पार्किंगची भीषण समस्या आहे. दुचाकीसोबतच चारचाकी वाहन नेमकी कुठे पार्किंग करायची ही डोकेदुखी वाहनचालकांना शहरात आहे. कारण दुचाकी पार्क करण्यासाठीच जागा नाही, अशावेळी चारचाकी वाहनांचा प्रश्न गंभीर आहे. याच समस्येवर तोडगा म्हणून मेट्रो शहरांमध्ये ज्याप्रमाणे मुख्य बाजारपेठेत ‘मल्टिलेव्हल पार्किंग’ आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शहरातसुद्धा पार्किंगसाठी ती सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. १०० वाहनांच्या ‘मल्टिलेव्हल पार्किंग’साठी किमान हजार ४०० वर्गफूट जागेची गरज असून त्यासाठी ४.५० कोटी रुपये खर्च येतो. हे “मल्टिलेव्हल पार्किंग’ पूर्णपणे अॅटोमॅटिक राहणार आहे. यामध्ये वाहनचालकाने पार्किंगच्या विशिष्ट ठिकाणी वाहन नेऊन उभे केल्यास पुढील पार्किंगची प्रक्रिया अॅटोमॅटिक सिस्टिमद्वारे होणार आहे. शहरातील राजकमल चौकालगत असलेल्या टाऊन हॉलला लागून ‘मल्टिलेव्हल पार्किंग’साठी तब्बल हजार वर्गफूट जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी २०० चारचाकी वाहनांचे “मल्टिलेव्हल पार्किंग’ तसेच गांधी चौकातील हजार ४०० वर्गफूट जागेत १०० वाहनांचे “मल्टिलेव्हल पार्किंग’, असे एकूण दोन ठिकाणी एकूण ३०० वाहन पार्किंगची सुविधा वाहनचालकांसाठी लवकरच करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी मनपा आयुक्त, स्थायीचे सभापती, नगरसेवक दिनेश बुब, शहर अभियंता जीवन सदार यांनी जागेची पाहणी केली.

प्रशासकीय इमारतीची जागा बदलणार
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी सध्या ज्या ठिकाणी मनपा आयुक्तांचा शासकीय बंगला आहे, त्या ठिकाणी तयार करण्याचे ठरले होते. मात्र, सदर जागा ही अपुरी असल्याचे त्या जागेवरील प्रस्तावित इमारत रद्द करून विद्यापीठ मार्गावर असलेल्या एकर जागेत तयार करण्याचे विचाराधीन आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. ती जागा मिळाल्यास त्या ठिकाणी प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत तयार करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले
बातम्या आणखी आहेत...