आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजलीला नियमांनुसारच जमीन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मिहान प्रकल्पामध्ये पतंजली समूहाला नियमांच्या अधीन राहूनच जमीन उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी पतंजली समूहाला अत्यंत कमी दरात जमीन दिल्याचा आरोप केला होता.

मिहानमध्ये पतंजलीच्या फूड आणि हर्बल पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, योगगुरू रामदेवबाबा, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, फूड हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे परिवर्तन होईल. उद्योगांनी येथील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा, असे बंधन घातले आहे. जे उद्योजक फूड पार्कसाठी जमीन घेतील त्यांनी तीन वर्षांत उद्योग सुरू करावा, अशीही अट आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रशिक्षण देऊन या उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची अटही घालण्यात आली आहे. पतंजलीमुळे विदर्भातील ५० हजार युवकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय दक्षता आयोगाच्या निकषांचे पालन
पतंजली उद्योगाला जागा देताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या निकषानुसारच देण्यात आली आहे. या जागेसाठी तीन वेळा मिहानतर्फे निविदा काढण्यात आल्या. तिन्ही वेळा पतंजलीने निविदा सादर केली. सर्व नियम अटींच्या पूर्ततेनंतरच या उद्योगास जागा देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी या वेळी दिले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, महापौर प्रवीण दटके यांच्यासह मोठ्या संख्येने विदर्भातील शेतकरी उपस्थित होते.

पतंजलीच्या फूड पार्कचे भूमिपूजन शनिवारी झाले. या वेळी मुख्यमंत्र्यांचा फडणवीस यांचा रामदेवबाबा यांनी सत्कार केला. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी.

किमान २५ हजार हातांना रोजगार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा कारखाना विदर्भात सुरू होणे म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्या दिशेने केलेला मोठा प्रयत्न असल्याचे सांगितले. तर हा प्रकल्प येत्या सहा महिन्यांत सुरू होऊन त्यातून किमान २५ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील, अशी ग्वाही या वेळी योगगुरू रामदेव बाबा यांनी या वेळी बोलताना दिली.

पुढील स्लाइडवर वाचा, टीका करणारे नेते विघ्नसंतोषी : नितीन गडकरी
बातम्या आणखी आहेत...