आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नगर-अाैरंगाबाद जिल्ह्यांत पतजंलीचे डेअरी प्रकल्प, रामदेवबाबांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘पतंजली’च्या नागपुरातील हर्बल व फूड पार्कच्या प्रकल्पात सुमारे १ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून हा पतंजलीचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प राहील. सहा महिन्यांत या प्रकल्पातून उत्पादन सुरू करण्याचे प्रयत्न असून किमान त्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष १५ ते २० हजार रोजगार निर्माण होतील,’ अशी माहिती योगगुरू रामदेवबाबा यांनी रविवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली. नगर आणि अौरंगाबादच्या पट्ट्यात डेअरीचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव उभारण्याचा मनाेदयही त्यांनी व्यक्त केला.

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी आपल्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. नागपुरातील प्रकल्पात सुमारे अडीचशे एकर जागेत ४० लाख फुटांचे बांधकाम केले जाणार असून हरिद्वारपेक्षाही मोठा प्रकल्प येथे होणार आहे. जगातील वैशिष्ट्यपूर्ण असा प्रकल्प ठरेल. त्यातून विदर्भातील १५ ते २० हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला.

विदेशातही प्रकल्प सुरू करणार
भविष्यात नागपूरसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, आंध्र व जम्मू-काश्मीरसह विदेशात नेपाळ व आफ्रिकी देशांसह पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातही प्रकल्प सुरू करण्याची तयारी राहील, असे त्यांनी सांगितले.
स्वदेशी जीन्स येणार
लवकरच वस्त्रनिर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याचे सांगून येत्या काही महिन्यांत तुम्हाला घालायला स्वदेशी जीन्सही उपलब्ध होईल. अशा अनेक उत्पादनांचे स्वदेशीकरण होणार असल्याचे रामदेवबाबांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...