आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी ते फिरत राहिले हातात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्याची उपराजधानी असा नावलौकिक असणाऱ्या नागपूरातील सगळ्यात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात सोमवारी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी एक विदारक दृश्य पाहायला मिळाले. एक व्यक्ती आपल्या हातात 26 ते 30 किलो वजनाचा ऑक्सिजन घेऊन फिरत होता. त्याच्या पुढे एक महिला होती. तिच्या हातात एक चिमुकले बाळ होते. त्या चिमुकल्याचे प्राण याच सिलेंडरवर टिकून होते. ज्यानेही हे दृश्य पाहिले त्याला एखाद्या व्यक्तीची काय हतबलता होऊ शकते याची प्रचिती येत होती.
 
- धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात कलमना मार्केट येथे राहणाऱ्या सौरव असरेट यांची पत्नी नीतूने एका बाळाला जन्म दिला. पण या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना बाळा घेऊन दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले.
- सौरव हे मजूरी करतात. त्यांना या रुग्णालयाने 49 हजाराचे बिल दिले. ते त्यांच्यासाठी खूपच होते. त्यांनी कसेबसे हे पैसे जमवले आणि रुग्णालयात भरले. 
- त्यानंतर ते आपल्या चिमुकल्याला घेऊन शासकीय रुग्णालयात आले. तिथे गंभीर रुग्णांना नेण्यासाठी साधे स्ट्रेचरही नव्हते आणि अटेंडटरही नव्हता. तेथील मावशीने या चिमुकल्याला आपल्या हातात घेत ओपीडीत घेतले. 
- सौरव आपल्या पत्नीसमवेत हातात 25 ते 30 किलोचा ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन त्याच्यांसोबत पळत होता. 
- या चिमुकल्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर त्याला वॉर्ड क्रमांक 5 मध्ये दाखल करण्यात आले.
 
अशी स्थिती नेहमीच
- नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमधील अशी स्थिती अतिशय सामान्य बाब मानली जाते. गंभीर रुग्णांना आपल्या खांद्यावर घेऊन फिरणारे सामान्य नागरिक येथे सहज दिसतात. त्यांना कोणीच वाली नसतो.
- गोरखपूरच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयांमध्ये येणारे सामान्य नागरिक कसे तेथील कर्मचाऱ्याच्या आणि व्यवस्थेच्या अनास्थेचे बळी ठरतात हे ठळकपणे समोर आले आहे.
 
मेयोतून गायब झालेले जम्बो ऑक्सिजन सिलेंडर अजुनही मिळालेले नाहीत
- इंदिरा गांधी शासकीय चिकित्सा महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) येथून मागील वर्षी जून महिन्यात ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर गायब झाले होते. 
- यावर 4 वेळा चौकशी समिती नेमण्यात आली पण गायब झालेल्या जम्बो सिलेंडरचा तपास लागलेला नाही.
- दफ्तरी नोंद असलेल्या हे सिलेंडर कधी 105 तर कधी 115 सांगण्यात आले. पण रुग्णालयाने किती खरेदी केले. किती दानशूरांनी दिले आणि किती पुरवठादाराने दिले याची कोणतीही दफ्तरी नोंद सापडली नाही.
- माजी अधीक्षक डॉ. अशोक गजभिये यांनी सांगितले की, 15 ते 20 सिलेंडर गायब झाल्याची बाब समोर आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...