आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक चालकाच्‍या मृत्‍यूने जमाव संतप्‍त, भंडाऱ्यात पेटवली पोलिस चौकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारा - पोलिस पाठलाग करत असलेल्‍या एका ट्रक चालकाने धावत्‍या ट्रकमधून उडी घेतली. यात त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. त्‍या नंतर संतप्‍त झालेल्‍या 300 ते 350 ट्रक चालकांनी लाखांदूर पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. दरम्‍यान, काहींनी आज (बुधवार) पहाटे 4 वाजताच्‍या सुमारास पवनी येथील पोलिस चौकीला आग लावून दिली.

नेमके काय आहे प्रकरण ?
- विरली बु. परिसरातून वाळूची तस्‍करी होत असल्‍याची गुप्‍त माहिती महसूल विभागाला मिळाली होती.
- त्‍या आधारे मंगळवारी रात्री 10 वाजताच्‍या सुमारास पोलिस आणि महसूल विभागाच्‍या संयुक्‍त पथकाने तीन ट्रकला अडवले.
- या पैकी दोन ट्रक थांबले. मात्र, तिसरा ट्रक चालक ट्रक घेऊन पळून जात होता.
- आपण पकडल्‍या जाऊ या भीतीने त्‍याने चालत्या ट्रकमधून उडी घेतली. त्‍याचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक चालकांनी पोलिस चौकीला लावली आग
या घटनेमुळे नागपूर-पवनी परिसरातील 300 ते 350 ट्रक चालक संतप्‍त झाले. त्‍यांनी बुधवारी पहाटे 5 वाजेपर्यंत लाखांदूर पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करून रोष व्यक्त केला. शिवाय पवनी येथील पोलिस चौकीला आग लावून दिली. अनुचित प्रकार टाळण्‍यासाठी पोलिस ठाण्‍यासमोर कडक बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डिव्हायडरला धडकून सुमो गाडी दरीत, दोन ठार, सहा जखमी...
बातम्या आणखी आहेत...