आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोत्‍यासारखे धान्‍य नव्‍हे मोतीच पिकवतो हा शेतकरी, वर्षाला कमावतो लाखो रूपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली- सततच्‍या नापिकीमुळे एकिकडे शेती पिकवणे कठीण झाले आहे. तर, दुसरीकडे गडचिरोली जिल्‍ह्यातील युवा शेतकरी संजय गटाडे हा गोड्या पाण्‍यात चक्‍क मोती पिकवतोय. ज्‍या शेतात पूर्वी काही क्‍विंटल धान्‍य पिकत होते. तेथे आता हा मोत्‍याचे पीक घेतोय. दरवर्षी संजय या शेतीतून लाखो रूपये कमावतो.
कसा तयार केला जातो मोती ?
- संजय 10 बाय 10 चौरस फुट तयार केलेल्‍या तळयात मोत्‍यांची शेती करतो.
- 3000 मोतींचे नग पिकवण्‍यासाठी त्‍याला 18 महिने लागतात.
- सर्वात आधी शिंपल्‍यांमध्‍ये साच्‍यात तो मोत्‍याचे बीज टाकतो.
- नंतर शिंपले बंद करून जाळ्याच्‍या सहाय्याने पाण्‍यात सोडतो.
- काही महिन्‍यानंतर या शिंपल्‍यांमध्‍ये मोती तयार होतो.
- संजय सांगतो की, वर्षभरात तो या शेतीतून 11 ते 12 लाख रूपये कमावतो.
- मोती तयार व्‍हायला 5 ते 6 महिने एवढा कालावधी लागतो.
- शिवाय शिंपल्यांची बीजे नदीतून मिळत असल्याने त्‍याचा उत्‍पादन खर्च कमी आहे.
डिझायनर मोती
- संजयने डिझायनर मोती तयार करण्‍याचे तंत्रही शोधून काढले आहे.
- मोती तयार करण्‍यासाठी त्‍याने खास साचे तयार केले आहेत.
- या साच्‍यांमध्‍ये गणपती, बुद्ध, क्रॉस अशा विविध आकारातील मोती त्‍याने तयार केलेत.
- बाजारात एका मोत्‍याला 300 रुपये प्रती नग एवढा भाव आहे.
उच्‍चशिक्षीत आहे संजय
संजय शेतकरी परिवारातील आहे. त्‍याने वकीलीचे शिक्षण घेतले आहे. पुढे नोकरी सोडून त्‍याने शेती करण्‍याचा निर्णय घेतला. मोती कसे तयार होतात, याबाबत बालपणापासून त्‍याला कुतूहल होते. तो गडचिरोलीच्‍या अॅग्रिकल्‍चर कॉलेजमध्‍ये गेला. तेथून एका प्राध्‍यापकाच्‍या मदतीने त्‍याने पाण्‍यात मोती तयार करण्‍याचे तंत्र शोधून काढले.
मोत्‍यांचे प्रकार
- नैसर्गिक, संवर्धित आणि कृत्रिम असे मोतींचे तीन प्रकार आहेत. त्‍यानुसार त्‍याचे रोपणही होते. - कॅल्‍शिअम पदार्थ किंवा शिंपल्यापासून बनवलेले मणी किंवा केंद्रक मोती रोपणात वापरतात.
- शिंपल्‍यात ठराविक एका शिंपल्याचा तुकडा किंवा भुकटी रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला 3 वर्षे ठेवला जातो. त्या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय. हा मोती नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. त्‍याची गुणवत्‍ताही अधिक असते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शिंपल्‍यांमध्‍ये असे तयार होतात मोती...