आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक उन्माद लोकच खपवून घेणार नाहीत, शिंदेंचा सरकारला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘देशात धार्मिक उन्माद माजवण्याचे प्रयत्न होणार असतील, तर येथील लोकच ते खपवून घेणार नाहीत, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले.

मारवाडी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार शिंदेंच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर शिंदे माध्यमांशी बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे या देशात कोणी धार्मिक उन्माद निर्माण करणार असेल, तर येथील लोकच ते खपवून घेणार नाहीत. राज्यकर्त्यांची हे लक्षात घेण्याची गरज आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. पुरस्कार वापसीच्या घटनांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात या देशातील साहित्यिकांचे योगदान मोठे आहे.
अनेक चळवळींचा जन्मच त्यांच्या लेखणीतून झाला आहे. तेच पुरस्कार परत करत असतील तर हा दुर्दैवी प्रकार आहे.’ दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे दोनच टप्पे पार पडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीनंतर कोणाचे सरकार येणार, याचा अंदाज आताच वर्तवणे कठीण असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला.