आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासिका शिक्षकांना मिळणार नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्हापरिषद मार्फत रिक्त असलेल्या पदांवर घडाळी तासिका शिक्षकांना नियुक्ती मिळणार असल्याची माहिती आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. नियमित शिक्षक भरतीवर बंदी आहे. त्यामुळे तासिका शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात धारणी, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मंगरुळ चवाळा येथे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. शासन आदेशानुसार नियमित शिक्षक भरतीवर बंदी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने २०१४ मध्ये विशेष निधीतून दोन वर्षाकरिता २९ दिवसांचे आदेश देऊन घडाळी तासिका तत्वावर नियुक्त्या देण्यात येत होत्या. २०१६ ला दोन वर्ष पूर्ण झाल्याने भरतीवर बंदी असल्याने पुन्हा घडाळी तासिका नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.

आमदार देशपांडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनात शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांच्यासोबत चर्चा केली. जाहिरात काढण्यात आल्याने आणखी एक महिना नियुक्तीस शिक्षक रुजू होण्यास लागणार आहे. शिवाय पुढच्या महिन्यापासून दिवाळीची सुटी देखील लागणार आहे. प्रथम सत्र परीक्षा होणार असल्याने जाहिरात देत पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्याची सूचना केली होती. गरज वाटल्यास पुढच्या सत्राकरिता २०१७ मध्ये जाहिरात देऊन प्रतिक्षा यादी तयार करावी.
जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे विनाअनुदानित तुकडीवर नियुक्ती अनुदानाकरीता करावयाची कारवाई यासह अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कॅम्प स्थित जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत विघोषित शाळा वलगाव रोड शाळेचे जाहेद खान यांना सेवा अधिग्रहीत करुन तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्याची सूचना करण्यात आली. यावेळी सै. राजीक सै. गफ्फार, दाऊद खान, चंद्रशेखर पिंपळे उपस्थित होते.

नियमित शिक्षकांची भरती बंद असल्यामुळे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात डीएड्धारक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. अशा वेळी जिल्हा परिषद मार्फत रिक्त पदांवर घडाळी तासिका शिक्षकांना पुन्हा नियुक्ती मिळणार असल्याने बेरोजगारीच्या काळात तासिका शिक्षकांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...