आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीला ब्लॅकमेल करणाऱ्यांना 15 तासातच रंगेहात पकडले, सायबर सेल व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीची बॅग २९ डिसेंबरला हरवली होती. या बॅगमध्ये मोबाइल ६०० रुपये रोख होती. तसेच मोबाइलमध्ये असलेल्या मेमरी कार्डमध्ये काही आक्षेपार्ह छायाचित्र होते. या छायाचित्राच्या आधारेच ज्यांना मोबाइल सापडला होता, ते युवतीला ५० हजार रुपये मागत होते.
 
मात्र युवतीने सायबर क्राईम पथकाचे प्रमुख कांचन पांडे यांच्याकडे तक्रार केली. याच आधारे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. २२) सायंकाळी वाजतापासून ते गुरुवारी सकाळी वाजेपर्यंत ऑपरेशन राबवून दोन्ही ‘ब्लॅकमेलर्स’ना रंगेहात गुरुवारी (दि. २३) सकाळीच अटक केली आहे. 
 
उज्वल अशोक गजभिये (२८) आणि सुशील भीमराव गजभिये (२४ दोघेही रा. माधान, चांदूरबाजार) असे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून युवतीचे मेमरी कार्डसुद्धा जप्त केले आहे. शहरातील युवतीची २९ डिसेंबरला बॅग हरवली होती. त्यामधील मेमरी कार्डमध्ये असलेल्या आक्षेपार्ह छायाचित्र उज्वल सुशील यांना दिसल्यानंतर त्यांनी १५ फेब्रुवारी २०१७ ला युवतीला फोन करून मेमरी कार्ड पाहिजे असल्यास ५० हजार रुपये मागितले. 
 
त्याचवेळी सदर युवतीने सायबर पथकाचे एपीआय कांचन पांडे यांना घटनाक्रम सांगितला. सदर युवतीला आलेल्या कॉलचा शोध घेतला असता हा कॉल गाडगेनगरमधील एका ‘क्वॉईन बॉक्स’वरून आला असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. दरम्यान २२ फेब्रुवारीला सांयकाळी पुन्हा त्यांचा युवतीला फोन आला. हा फोन चांदूरबाजारच्या ‘क्वॉईन बॉक्स’वरून आला होता. त्यावेळी पोलिसांनी युवतीच्या मदतीने ब्लॅकमेलर्सना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. या दोघांना शहरात बोलवले, त्यांनी पुन्हा गाडगेनगरच्या त्याच ‘क्वॉईन बॉक्स’वरून फोन केला. पोलिसांनी तत्पूर्वीच तो ‘क्वॉईन बॉक्स’ शोधला होता. त्यामुळे दोन पोलिस त्याठिकाणी दबा धरुन बसले होते. त्यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता दुसरा माधानला गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्रीच माधानला पोहचले त्यांनी दुसऱ्यालाही ताब्यात घेतले. त्याचवेळी या दोघांकडून मोबाइल आक्षेपार्ह छायाचित्र असलेले ते मेमरी कार्डसुध्दा जप्त केले आहे. 
 
या प्रकरणी गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करून दोघांविरुद्धही गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल १५ तासाच्या ऑपरेशननंतर पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आले होते. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कांचन पांडे, पीएसआय प्रवीण पाटील, सुभाष पाटील, संग्राम भोजने, सहस्त्रबुध्दे, मनीष गवळी, मयुर बोरकर, कास्देकर राजेश बहीरट यांनी ही अटकेची कारवाई केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...