आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैयक्तिक शौचालय निधीचा केला दुरुपयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वैयक्तिक शौचालय निधीचा दुरुपयोग करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत महापालिकेच्या भाजी बाजार झोन अंतर्गत येणाऱ्या २७ लाभार्थ्यांविरोधात फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत भाजी बाजार झोन क्रमांक मध्ये ८५०० रुपयांचा प्रथम टप्पा वितरित करण्यात आला. प्रथम टप्पा देण्यात आल्यानंतर देखील अनेक लाभार्थ्यांकडून शौचालयाचे बांधकाम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. शौचालय बांधकाम करण्याबाबत वारंवार सुचना देण्यात आल्या, मात्र त्यानंतर देखील बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याने २७ लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निधीचा दुरुपयोग केलेल्या लाभार्थ्यांमध्ये अलीम नगरातील सै. लतीफ सै. रहीम, मुझफ्फर बेग मेहमूद बेग, अाशिक अली इर्शाद अली, सै. जफर सै. जब्बार, शेख रहेमान शे. अकबर, अब्दुल शकील अब्दुल जब्बार, अब्दुल जावेद अब्दूल हसन, असलम खान नासीर खान पठाण, सुलताना बानो शेख इक्बाल, झुबेदा बी अब्दूल शेख, यावर खान दौत खान, खातुन बी शेख हनीफ, ताज नगरातील नवाब खान सुजात खान, अख्तर बानो सै. जामील, कामील अहेमद नाझीरुद्दीन, नवाज मेहमूद सैय्यद, गुलशन नगरातील हमीदा बी शेख बहामीया, शबाना परवीन खालीद बेग, रहेमत नगर शेख अय्युब शेख याकुब, शेख अमीन शेख याकुब, मुस्तफा नगरातील अब्दुल सलीम अब्दुल हमीद मेमन, कबीर नगरातील रियासत बी शेख जब्बार, हरिदार पुरा फेहमीदा बी राहत अली, रोशन नगर येथील मोहम्मद इब्राहिम मो. नासीर, कलीम नगर येथील शेख आशिक शेख असलम, जुनी टाकसाल येथील मनिषा उमेश तवर, कुंभारवाडा येथील प्रमोद मारोडकर यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...