आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणाची व्याप्ती मराठवाड्यापर्यंत; विदर्भात 8 शेतकऱ्यांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/यवतमाळ/अमरावती- यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी-शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्व विदर्भात अशाच प्रकरणात ८ जण दगावल्याचे समोर येत आहे. मराठवाड्यातही एका शेतमजुराचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात कृष्णापूर येथील महादेव ठावरी (४८) शेतकऱ्याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत बुलडाणा, अकोल्यातही मृत्यूच्या घटना घडल्याचे स्पष्ट झाले. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात ८६ बाधितांना दाखल केले होते. यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. आरोग्य विभाग वा रुग्णालय प्रशासन मात्र हे कीटकनाशकाच्या विषबाधेचे मृत्यू आहेत, याला दुजोरा देत नाहीत.

सिल्लाेड : कीटकनाशकाची रिअॅक्शन आल्याने बळी
फवारणी करताना कीटकनाशकाची रिअॅक्शन आल्याने पुंडलिक बाळा अाेपळकर (४५, रा. पालाेद) यांचा मंगळवारी अाैरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. पालाेद येथील सरपंच मच्छिंद्र पालाेदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुंडलिक २९ सप्टेंबरला दुसऱ्याच्या शेतात विषारी अाैषधांची फवारणी करत असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना सिल्लाेडच्या उपरुग्णालयात नेण्यात अाले. तेथील डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घाटी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. सिल्लाेड पाेलिसांनी अाकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.

अमरावती जिल्ह्यात १८५ जणांना बाधा
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालात जिल्ह्यात विषबाधेच्या सुमारे १८५ घटना समोर आल्या आहेत. ७ सप्टेंबरला म्हैसपूर पाथरवीरा येथील किरण ठाकरे (१९) व रामा नरहरी ठाकरे (३०) या दोन युवकांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाचा राज्यस्तरीय प्रोटोकॉल
आरोग्य विभागाने राज्यस्तरीय प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यात उपचाराच्या प्रक्रियेसह विषबाधा, फवारणी आणि आत्महत्येच्या घटनांच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. अशा रुग्णांचा आढावा घेतला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...