आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज मिळत नसल्यास थेट मला कळवा, सांसद आदर्श ग्राम योजनेत ह्या सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्रामीण भागातील विविध कर्ज योजनेत बँकेचे अधिकारी त्रास देत असतील, तर थेट मला कळवा. विनाकारण त्रास देणाऱ्या संबंधित बँकेच्या बाबतीत केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन केंद्रीय कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी अमरावती जिल्ह्यातील टिमटाला येथे दिले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे जन्मगाव असलेल्या टिमटाला येथे गोयल यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान जनधन योजना, मुद्रा योजना, विमा योजना अशा विविध महत्त्वपूर्ण योजना गोरगरीब जनतेकरिता राबवण्यात येत आहे. या सर्व योजना सर्वसामान्य जनतेकरिता आहेत. या योजनेचा फायदा नागरिकांना झाला पाहिजे. ही बँकांची जबाबदारी आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवक रोजगारक्षम होऊ शकतात. मागील वर्षी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कोटी बेरोजगारांना लाख २० हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. या वर्षी लाख ८० हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात येणार आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या टिमटाला तसेच निरसाना, खिरसाना, जनुना या चारही गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने प्रस्तावित असणारे विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण दर्जेदार होण्यासाठी प्रशासनासोबत लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.
अडगावचाही केला विकास आराखड्यात समावेश : टिमटाळायेथे आयोजित जाहीर सभेत बोलताना गोयल म्हणाले की, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारक निर्माण करण्यासाठी झटलेले एकनाथ रामचंद्र रानडे यांचे जन्मस्थळ असलेले टिमटाला या गावाचा केंद्र राज्य शासनाच्या विविध विकासात्मक योजना राबवून सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास करण्यात येईल. सांसद आदर्श ग्रामविकास आराखड्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनुना, टिमटाळा, खिरसाना, निरसाना या चार गावांचा समावेश आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले तसेच गावकऱ्यांच्या मागणीनुसार अडगाव हे गावसुद्धा सांसद आदर्श ग्राम योजनेत समावेश करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी कार्यक्रमात केली. या पाचही गावांचा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने त्यांचे विकासात्मक क्लस्टर स्थापन करण्यात आले आहे. या क्लस्टरमध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, बँक, पोस्ट ऑफिस, रस्ता रुंदीकरण-रस्तेविकास, शौचालय बांधणी, पिण्याचे पाणी, विजेचा सुरळीत पुरवठा, अन्नधान्याचा पुरवठा आदी मूलभूत बाबींचा समावेश राहील.

चारकृषी मोटारपंपाचे वितरण : शेतकऱ्यांनाशाश्वत सिंचनाची सोय उपलब्धतेसाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नालाखोलीकरण, शेततळे, बंधारेमार्फत पाण्याची सोय करून देण्यात येणार आहे. सुमारे २३२ मोटारपंप चार गावांना वितरित करण्यात येणार आहे. आगामी काळात सुमारे लाख १६ हजार नवीन मोटारपंप वितरित करण्यासाठी प्रशासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा विकास हा गावांच्या विकासावर अवलंबून असतो. यासाठी सांसद आदर्श ग्राम योजनेत समावेश केलेल्या पाचही गावांच्या केंद्रस्थळी ग्रामविकास संकुल तयार करण्यात येणार आहे. या संकुलामध्ये राष्ट्रीयीकृत बँक ग्राहक सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, पोलिस चौकी, मदत केंद्र, औषधांचे दुकान, ग्रंथालय अभ्यासिका, सभागृह, संगणक प्रशिक्षण केंद्र, शिवणकाम प्रशिक्षण केंद्र, नागरी ई-सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, महावितरण कार्यालय बिलभरणा केंद्र, उत्पादक कंपनी कार्यालय, शेती अवजारांची बँक, बी-बियाणे केंद्र, गोडाउन सुविधा, महिला बचत-गट उत्पादन विक्री केंद्र भारतीय दूरसंचार निगम सुविधा टॉवर, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आदी लोकोपयोगी सेवांचा समावेश राहील.

यांची होती उपस्थिती
या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार अडसूळ, वर्धेचे खासदार रामदास तडस, आमदार डाॅ.सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, वीरेंद्र जगताप, जि. प. सदस्य अभिजित ढेपे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तुषार भारतीय, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सुनील सरोदे, टिमटालाचे सरपंच अशोक भेंडे, अरविंद नळकांडे, गटविकास अधिकारी सूरज मोहोड आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...