आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : मोठ्या प्रमाणात रोजगाराची क्षमता असलेल्या बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन अनोखी योजना लागू करण्याच्या विचारात आहे. बांधकामात बांबूचा वापर केल्यास वाढीव एफएसआय देण्याची योजना असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
यासंदर्भात राज्य शासनाने वित्त विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्या अध्यक्षतेखाली बांबू प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल या महिन्याअखेर अपेक्षित आहे.

बांबूची लागवड आणि प्रक्रिया क्षेत्रात चीनने मोठी प्रगती केली असून बांबूच्या निर्यातीतून चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळत आहे. दरवर्षी चीनकडून सुमारे १ लाख कोटी रुपयांचा बांबू निर्यात होतो. या क्षेत्राची रोजगार क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यात बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
बांबूच्या कमर्शियल लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यासाठी गेल्याच वर्षी राज्य शासनाने बांबू मंडळ स्थापन केले आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...