आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्लास्टिक’च्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा होतोय मोठा ऱ्हास; प्लास्टिक प्लेट्स, वाट्यांवर बंदीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवदा - शहरात कचऱ्याने राक्षसाचे रुप धारण केले आहे. त्यात मुख्यत्वे प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आजच्या चंगळवादी यूज अँड थ्रो संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्लास्टिक थर्माकोलच्या लहानमोठ्या प्लेट्स, पाण्याचे ग्लास, द्रोण वाट्या यांचा मोठा समावेश आहे. या पदार्थांचे विघटन होण्यास वर्षानुवर्षे लागतात. अविघटनशील वस्तूंचा राक्षस असाच वाढत राहीला, तर तो पर्यावरणाला तसेच मनुष्यासह मुक्या जनावरांना घातक ठरत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या या प्लास्टिक वस्तूंवर बंदी आणण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

घरी होणारे लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच अन्य प्रसंगी पर्यावरणाला अत्यंत घातक धोकादायक ठरणाऱ्या प्लास्टिक प्लेट्स, वाट्या ग्लास तसेच थर्माकोलच्या प्लेट्स द्रोण आदींचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. पर्यावरणाला धोकादायक ठरणाऱ्या या साहित्याचा मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये वापर करण्यात येतो. पुर्वी प्रमाणे पळसाच्या झाडापासून तयार होणाऱ्या पत्रावळी द्रोण या आधुनिक युगात मिळत नाही. मिळाल्या तरी त्यांचा खर्च देखभाल खिशाला परवडणारी असते. याशिवाय स्टीलच्या प्लेट्स, वाट्या, ग्लास वापरले, तर त्यांना स्वच्छ करण्याचा त्रास. या सर्व गोष्टींपासून सुटका मिळावी, तसेच त्यापासून होणाऱ्या त्रासाच्या सबबीखाली खालावलेल्या दजार्च्या साहित्यापासून या प्लेट्स तयार करण्यात येतात. त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. 
 
या पत्रावळींमध्ये वाट्यांमध्ये उरलेले अन्न जनावरेदेखील खातात. पर्यावरणासह जनावरांच्या जीवालाही हा प्लास्टिक कचरा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे जनावरांचे जीवनही धोक्यात आले. लग्न समारंभ अन्य कार्यक्रमादरम्यान वापरण्यात येणाऱ्या या पत्रावळींचा प्लास्टिक कचरा सर्वत्र पसरलेला आढळून येतो. विशेष म्हणजे या कचऱ्याचे विघटन होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. 

पळसाची झाडे झाली दुर्मिळ : पूर्वीपळसाच्या झाडाच्या पानापासून पत्रावळी द्रोण तयार करण्यात यायचे. त्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध व्हायचा. वापर झाल्यानंतर या पत्रावळ्या द्रोणचे सहज विघटन होत असे, परंतु काही वर्षांपासून पळसाची झाडे दुर्मिळ झाली आहेत. परिणामी यूज अॅण्ड थ्रो प्लास्टिकचा वापर वाढला आहे. लग्नकार्य, वाढदिवस, तसेच इतर सर्वच कार्यक्रमांमध्ये सर्रास प्लास्टिक थर्माकोलच्या डिश ग्लासचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. पळसाची झाडे लावून त्यापासून पत्रावळी द्रोण तयार केल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. 
 
यावर बंदी आणावी 
प्लास्टिकमुळेपर्यावरणाचेमोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सध्यस्थितीत सर्वत्र प्लास्टिकचा बोलबाला दिसत आहे. त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होत असल्याने त्यावर बंदी आणणे आवश्यक आहे. तसे झाल्यास समाजहित जोपासले जाईल, असे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले.’’ नकुल सोनटक्के, नागरिक 

विघटन होतच नाही 
-प्लास्टिकच्या वस्तूंचे विघटन होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. त्या जमिनीत पुरल्या तरी त्यांचे विघटन होत नाही किंवा त्या सडतही नाहीत. त्या जाळल्यास सर्वत्र धोकादायक धूर तयार होतो. हा धूर पर्यावरणासह मानवाला घातक ठरतो. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत- अभिजित हिरुळकर, नागरिक 

सर्वांनी वापर टाळावा 
- परिसरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांनीही यूज अॅण्ड थ्रो असणाऱ्या प्लास्टिक थर्माकोलचा वापर टाळणे आवश्यक आहे. गावाला स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे.’’ संजय वाघमारे, शिक्षक 
   
प्लास्टिक पिशव्यांमधील खाद्यपदार्थ खाऊ नका, आजाराला निमंत्रण 
प्लास्टिकचा कचरा जाळल्यानंतर बाहेर पडणारे विषारी वायू आरोग्याला धोकादायक आहेत. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. हा कचरा पुरल्या नंतरही त्याचे वर्षानुवर्षे विघटन होत नाही. आपण प्लास्टिकच्या पॅकिंग पिशव्यांमध्ये साठवलेले खाद्यपदार्थ खातो. असे पदार्थ खाल्ल्यामुळे अल्झायमर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. याचे गंभीर परिणाम नाकापासून ते फुफ्फुसापर्यंत होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...