आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडीसाहित्यात लोकप्रियतेचे शिखर गाठणारे कविवर्य शंकर बडे यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- वऱ्हाडी साहित्यात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या शंकर बडे (७०) यांचे मेंदूतील रक्तस्रावामुळे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कौसल्याबाई, भारती सानप, नीता पालवे, कीर्ती सांगळे या तीन विवाहित कन्या आणि गजानन हा मुलगा असा परिवार आहे. जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी येथे मार्च १९४७ रोजी शेतकरी कुटुंबात शंकर गणपत उपाख्य ‘बाबा’ बडे यांचा जन्म झाला.
गावातच आठवी, दारव्ह्यातून मॅट्रिक आणि महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळच्या बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पार पडले. कवी बडे यांच्या अनेक कविता महाराष्ट्रभर गाजल्या.
बातम्या आणखी आहेत...