आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहरा जंगलातील अतिक्रमण पर्यावरण संतुलनास घातक, वन्यजीवांचे रक्षण करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोहरा जंगलात होत असलेले अतिक्रमण पर्यावरण संतुलनास घातक असल्याचे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे. जंगलात होत असलेल्या धार्मिक स्थळास विरोध करीत वन्यजीवांचे रक्षण करण्याची मागणी अमरावती पर्यावरण बचाव समितीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन देत केली आहे. जगात केवळ तीन हजार वाघ शिल्लक असून त्यात चीनमध्ये केवळ २० वाघ शिल्लक राहिले आहे. आशिया खंडात केवळ सहा देशांमध्ये वाघाचे अस्तित्व आहे. या देशांमध्ये भारतात केवळ १४११ वाघ शिल्लक असल्याची माहिती आहे.
 
 सुंदरता तसेच विशाल शक्तीचे प्रतिक म्हणून पृथ्वीवरील अलग प्राणी असल्याने वाघाला जंगलाचा राजा म्हटल्या जाते. देशातील राष्ट्रीय स्तरावरील वन्यजीव अभ्यासकांच्या मते शहरीकरणाच्या सपाट्यात जंगले सापडत आहे. त्यामुळे वाघांचे निवास स्थान असलेल्या जंगलांमध्ये मनुष्याच्या अतिक्रमणामुळे २०२० पर्यंत पृथ्वीवरील वाघ लुप्त होण्याची भिती व्यक्त होत आहे. मालखेड जंगल हे वाघांसाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. 
 
इंग्रजांनी देखील त्यांच्या शासन काळात शासकीय दस्तावेजांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मालखेड-पोहऱ्याचे जंगल हे वाघांचे नैसर्गिक निवासस्थान असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. येथील पहाड, पाणी तसेच भरपूर असलेले तलाव, दाट जंगल वन्यजीवांसाठी सुरक्षित आहे. 
 
 
इंग्रज अभ्यासक तथा तत्कालीन शासनकर्त्यांनी वाघांच्या संरक्षणासाठी जंगल असलेल्या भागात छत्री तलाव तसेच अन्य तलावांची निर्मिती केली. वाघ हा दुष्काळ तसेच अतिवृष्टीचा सामना करणारा वन्यजीव आहे. वाघांमुळे जंगल सुरक्षित राहत असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास त्याची मदत होते. 
 
राजस्थान मधून वाघ नष्ट झाल्याने तेथील जमीन वाळवंट झाली. तसेच तेथून आभाळांनी देखील तोंड फिरविल्याने सगळीकडे केवळ वाळवंट दृष्टिस पडते. भारतात मोजकेच वाघांचे नैसर्गिक निवासस्थान शिल्लक राहिले आहे. 
 
यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भानखेडा-छत्रीतलाव मार्गावरील वाघांचे नैसर्गिक निवासस्थान अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. अमरावती शहराला लागून असलेल्या या जंगलात देखील मानवाचे अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येत आहे. एका विशिष्ट समाजाकडून धार्मिकस्थळाचे निर्माण येथे केले जात आहे. खुद्ददस्तूर शासनकर्त्यांच्या उपस्थितीत या धार्मिकस्थळाचे उद्घाटन झाल्याने वन्यप्रेमींसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
 
 
 जंगलात होत असलेल्या या निर्माण कार्यामुळे शांत असलेले जंगल अशांत होण्याची भिती निर्माण झाली आहे. विश्वस्तरीय धार्मिकस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करण्यात आल्याने शांत वातावरण नष्ट झाले. त्यामुळे जंगलातील अनेक प्राणी बऱ्याच दिवसांपर्यंत लुप्त झाले किंवा त्यांनी पलायन केल्याचे निदर्शनास येत आहे. 
 
 
उद्घाटनासाठी वाहनांचे आवागमन झाल्याने प्रदूषण झाले, शिवाय तेथील मोठ्या पेंडाल प्रकाशामुळे वन्यप्राण्यांच्या प्रजनन शक्तीवर विपरीत परीणाम झाल्याचे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे. जंगलाच्या मधोमध होत असलेल्या धार्मिक स्थळाच्या निर्माण कार्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाने वाघ तसेच अन्य वन्य प्राणी धोका वाढल्याने पलायन करीत असल्याची स्थिती आहे. 
 
वाघांचे नैसर्गिक निवास्थान असलेल्या जंगलाच्या मधोमध होत असलेल्या विश्वस्तरीय धार्मिक स्थळामुळे पर्यावरण संतुलनाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. वाघ शिकार करण्यासाठी तब्बल २५ किलो मीटरच्या परीसरात भटकंती करतो, धार्मिकस्थळाचे निर्माण कार्य तसेच तेथील वीजेच्या दिव्यांमुळे वाघांना येथून पलायन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
 
वाघ नष्ट झाल्यास अन्य प्राणी देखील नष्ट होण्याची अधिक भिती आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ तसेच राष्ट्रीय पक्षी मोर असताना त्यांनाच राहण्यासाठी जागा नाही. जंगल वाघ देखील नष्ट झाल्यास पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. 
 
गंभीर राष्ट्रीय विषय 
काही बिल्डरांकडून चुकीच्या ठिकाणी विश्वस्तरीय धार्मिकस्थळ निर्माण करण्यास प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली. ही मंजूरी राष्ट्रहित तसेच संविधान विरोधी असल्याचे राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यात प्राणी मात्रांविषयी दयाभाव ठेवण्याचे सांगितले आहे. मात्र शासनाच्या उपस्थितीत धार्मिकस्थळ निर्माण कार्याचे उद्घाटन करण्यात आल्याने राष्ट्रपतींचे या विषयाकडे लक्ष वेधले. 
 
काही बिल्डरांकडून चुकीच्या ठिकाणी विश्वस्तरीय धार्मिकस्थळ निर्माण करण्यास प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली. ही मंजूरी राष्ट्रहित तसेच संविधान विरोधी असल्याचे राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यात प्राणी मात्रांविषयी दयाभाव ठेवण्याचे सांगितले आहे. मात्र शासनाच्या उपस्थितीत धार्मिकस्थळ निर्माण कार्याचे उद्घाटन करण्यात आल्याने राष्ट्रपतींचे या विषयाकडे लक्ष वेधले. 
बातम्या आणखी आहेत...