आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांगर मोर्चाला हिंसक वळण, प्रहारच्या २७ आंदोलनकर्त्यांसह १० पोलिस कर्मचारी जखमी,उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- प्रहारसंघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या नांगर मोर्चातील आंदोलकांवर पोलीसांनी बळाचा वापर केल्याने या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. आंदोलकांतर्फे करण्यात आलेल्या दगडफेकीत दहा पोलिस जखमी तर पोलीसांनी केलेल्या लाठीमारात २७ आंदोलक जखमी झाले. पोलिस आंदोलक सुमारे सात ते आठ मिनिटं चांगलेच आक्रमक होते. ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराच्या निषेधार्थ आ. बच्चू कडू यांनी रात्री उशिरा आंदोलनाचा पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे.
 
प्रहारच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नांगर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनासाठी जिल्ह्यातून सकाळी १० वाजतापासूनच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आगमन सुरू झाले होते. संत गाडगेबाबा मंदिरासमोरील प्रांगणात सुमारे ते १० हजार आंदोलन गोळा झाले होते. दरम्यान मैदानावर बच्चू कडू यांनी आंदोलकांना आचारसंहिता लागू झाल्यामुळे शांततेत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान पूर्वनियोजनानुसार मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार होता. परंतु, वेळेवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यास परवानगी िमळाल्याने आयुक्त कार्यालयावरील मोर्चा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दु. दोन ते अडीच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर हजारो माेर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पोहोचले. परंतु, बहुतांश मोर्चेकऱ्यांना मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार असल्याची माहिती नव्हती. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर मोर्चाला अडवण्यात आले. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवण्यात आल्याचा समज मोर्चेकऱ्यांचा झाला. महिला पोलीसांनी बॅरिकेट्स ओलांडून आत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना रोखले. परंतु, त्या जुमानत नव्हत्या. ते बघून काही कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी आधी हाताने बॅरीकेट्स बाजुला करण्याचा प्रयत्न केला असता पीआय पुंडकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी बळजबरीने ट्रॅक्टरचा उपयोग करून बॅरिकेट्स हटवण्यास सुरुवात केली.
 
जिल्हाधिकाऱ्यांसोबतची चर्चा ठरली निष्फळ 
आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दालनात बैठक बोलावली. या बैठकीत बच्चू कडू, आमदार वीरेंद्र जगताप, अॅड. यशोमती ठाकूर, सोमेश्वर पुसतकर, नगरसेवक दिनेश बूब यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री ११ वाजेपर्यंत कोणताही तोडगा निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दीडशे ते दोनशे कार्यकर्ते तळ ठोकून उभे होते. 

आमदार कडू यांचे अन्नत्याग आंदोलन 
दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार बच्चू कडू यांनी सायंकाळी जिल्हा कचेरीपुढे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे. 

या मागण्यांसाठी काढला होता मोर्चा 
नोटबंदीकायद्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या सोयाबिन, कापूस, तूर, धान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु.मदत देण्यात यावी, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे एमआरएजीएसमध्ये घेण्यात यावी, शेतकऱ्यांना देय असलेल्या पिक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात यावी, शेतकरी हितार्थ स्वाभिमान आयोग त्वरित लागू करण्यात यावा, ठिबक सिंचनाचे प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना त्वरित द्यावे, शेतकऱ्यांसह शेतमजुरांना आरोग्य विमा तसेच अपघात विम्याचा लाभ देण्यात यावा, मायक्रो फायनान्सने दिलेले कर्ज माफ करण्यात यावे ,वीज पुरवठा कापलेल्या कृषी पंपांच्या देयक रकमेत वाढ करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

 
बातम्या आणखी आहेत...