आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोतवाली पोलिसांनी चाेरट्यांकडून जप्त केले तब्बल अठरा मोबाइल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात मागील काही दिवसांपासून मोबाइल चोरींच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २० ऑगस्टला नवाथे चौकातील दहीहंडीतून एकाच दिवशी पन्नासपेक्षा अधिक माेबाइल लंपास झाले आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी (दि. १) एका चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल अठरा मोबाइल लंपास केले आहे. 
 
जमु ऊर्फ जम्बो ऊर्फ सैयद जमीर सैयद हुसेन (३०, रा. उस्माननगर, अमरावती)असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात आठ दिवसांपुर्वी एका महिलेने मोबाइल चोरीची तक्रार दिली होती. त्यावेळीपासूनच कोतवाली पोलिस मोबाइल चोरट्याच्या शोधात होते. 

दरम्यान दोन दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांना या चोरट्याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे कोतवालीचे पथक त्याच्या मागावर होते. त्यामुळे शुक्रवारी पहाटे त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांना सुरूवातीला एक मोबाइल मिळाला. त्याच्याकडे मोबाइलबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी सतरा मोबाइल मिळून आले आहे. असे एकूण ६६ हजारांचे अठरा मोबाइल जप्त केले असून नेमके कोणकोणत्या ठाण्याच्या हद्दीतून त्याने हे चोरी केले आहे, याबाबत पोलिस माहीती घेत आहे. त्याच्याकडून शहरातील इतरही ठाण्यातील चोऱ्यांबाबत कबुली मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई कोतवालीचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल खोब्रागडे, विनोद भगत, सचिन शेळके, आशिष विघे यांच्यासह अन्य पोलिसांनी केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...