आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडून पळालेला आरोपी झाडावर सापडला, पाणी प्यायला गेला आणि पोलिसांच्या हातात आला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एका अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीविरुद्ध रहिमापूर पोलिस ठाण्यात २५ जुलैला बलात्कार बाल लैंगिक अत्याचार कलमाद्वारे गुन्हा दाखल होता. या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक झाल्यानंतर ऑगस्टपर्यंत पोलिस काेठडी सुनावली होती. दरम्यान सोमवारी (दि. ३१) रात्री वाजताच्या सुमारास पोलिसांच्या तावडीतून त्याने पळ काढला. तर आज ऑगस्ट रोजी रहिमापूर पोलिसांनीच गावंडगाव शिवारातील एका झाडावरून पकडले आहे.

 पंकज गजानन लव्हाळे (२४, रा. हिंगणी गावंडगाव) असे या आरोपीचे नाव आहे. पंकज लव्हाळेविरुध्द रहिमापूर पोलिसांनी पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. परिचितच एका युवतीवर पंकजने साडेसहा महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. दरम्यान त्या युवतीला गर्भधारणा झाली आहे. त्यामुळेच पिडीत युवतीने २५ जुलैला तक्रार दाखल करताच रहिमापूर पोलिसांनी पंकजला पुण्यातून ताब्यात घेतले. पंकज कामानिमीत्त सद्या पुण्यात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला २८ जुलैला अटक झाली होती. न्यायालयाने ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या वैद्यकिय चाचण्या तपासणी करण्यासाठी सोमवारी रहिमापूर पोलिसांनी त्याला रुग्णालयात आणले होते. रुग्णालयातून परत ठाण्यात आणले, त्यावेळी ठाण्याच्या परिसरातून पंकजने दोन पोलिसांना चकमा देवून पळ काढला होता. 
 
दरम्यान रहिमापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीचे पथकही पंकजचा शोध घेत होते. रहिमापूर पोलिसांनाच मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गावंडगाव शिवारात असलेल्या एका शेतातील झाडावर बसला होता, त्या झाडावरून त्याला ताब्यात घेतले आहे. असे रहिमापूर पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान आरोपीने पलायन केल्या प्रकरणात एसडीपीओ सुनिल जायभाये यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...