आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोपीला मिळाली आता पोलिस कोठडी, तीन आरोपी अद्यापही फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- शहरात पूर्ववैममनस्यातून धारदार शस्त्राने गोपाल उर्फ आशिष मिश्रा या युवकाचा खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शहरात पूर्ववैममनस्यातून धारदार शस्त्राने गोपाल उर्फ आशिष मिश्रा या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना विठ्ठलवाडी परिसरातील नविन भाजीमंडीत रविवारी घडली असून त्याच दिवशी या प्रकरणातील एकाला शहर पोलिसांनी अटक केली. पन्न उर्फ हिरालाल जयस्वाल वय ३४ वर्ष रा. अरूनोदय सोसायटी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आज दि. जुलै रोजी पन्न याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील नविन भाजीमंडीत दि. जुलै रोजी पहाटेच्या सुमारास आशिष उर्फ गोपाल गंगाधर मिश्रा वय ३५ वर्ष रा. प्रभात नगर या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी गंगाधर रूद्रधर मिश्रा यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पन्न उर्फ हिरालाल जयस्वाल रा. अरूनोदय सोसायटी, शेख अलीम उर्फ कवट्या, जान्या ढोले दोघेही रा. तलाव फैल, प्रशांत सालोडकर याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी याप्रकरणातील पन्न उर्फ हिरालाल जयस्वाल याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान आज सोमवारी पन्ना याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिघे अद्यापही पोलिसांना मिळून आलेले नाही. याबाबतचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सी.एम.झळके करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...