आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी फायनान्स अधिकारी बनून शोधून काढला चोरीचा ऑटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अचलपूर येथून ३०० रुपयांमध्ये ऑटो ठरवून जमिल खान कासम खान (४९, रा. अचलपूर) नामक ऑटोचालकाला मारहाण करून ऑटो पळवल्याची घटना दोन दिवसांपूर्वी अचलपूर ते अंजनगावसुर्जी मार्गावर घडली होती. याप्रकरणी अंजनगावसुर्जी पोलिसांत तक्रार दाखल होती. या प्रकरणात शोध घेण्यासाठी एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक पंकज काकडे त्यांच्या पथकाने चक्क फायनान्स अधिकारी असल्याचे भासवून अवघ्या २४ तासांत या प्रकरणातील म्होरक्याला पकडून ऑटोसुद्धा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १८) करण्यात आली आहे.
अब्दुल कदिर बन्नीभाई अब्दुल सत्तार (६५, रा. चोहट्टा बाजार, अकोट, जि. अकोला) याला पोलिसांनी अटक केली आहे. याच वेळी ऑटोचालकाला मारहाण करून ऑटो पळवणारे दोघे मात्र पसार झाले असून, पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. या प्रकरणात ऑटोचालक जमिल खान कासम खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १७ जूनला अज्ञात आरोपीविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे सदर प्रकरणात एलसीबीची चमू अकोटमध्ये पोहोचली. त्या वेळी हे प्रकरण फायनान्स खरेदी विक्रीच्या भानगडीमधून झाल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी या ऑटोचा मूळ मालक शोधला, त्याने सांगितले की, हा ऑटो अब्दुल कदिर बन्नीभाई अब्दुल सत्तार याला विकला होता. त्याने हा ऑटो आणखी एकाला त्याने दुसऱ्याला अशा पद्धतीने चार ते पाच जणांनी खरेदी विक्री केली होती, मात्र सदर ऑटोवरील कर्ज भरले नव्हते. त्यामुळे अब्दुल कदिर बन्नीभाई अब्दुल सत्तारने अकोटच्या दोन युवकांना हा ऑटो पळवून आणण्यास सांगितले होते.