आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम ब्रँचला तुर्तास पीआय नेमणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तालयाची 'आन, बान आणि शान' असलेल्या क्राईम ब्रँचच्या प्रमुखाला (पीआय) एसीबीच्या पथक कार्यालयात येऊन अटक केल्याने पोलिस दलाची नामुष्कीची झाली आहे. दरम्यान या कारवाईमुळे पोलिस आयुक्तांनाही धक्का बसला असून,तुर्तास क्राईम ब्रँचला कोणत्याही पोलिस निरीक्षकाची िनयुक्ती करण्याचा निर्णय आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी घेतला आहे.नवीन पीआयची नियुक्ती होईस्तोवर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश अणे हे गुन्हे शाखेकडे 'लक्ष' देतील, असेही पोलिस आयुक्तांनी शनिवारी (दि. २२) स्पष्ट केले.

मागील काही दिवसांपासून क्राईम ब्रँचकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याचे यापूर्वीही पोलिस आयुक्तांनी मान्य केले होते. यातच एसीबीची कारवाई झाल्याने आयुक्तालयाच्या ढिसाळ कारभाराच्या जखमेवर मीठ चोळल्या गेल्याची चर्चा आहे. शुक्रवारी झालेल्या एसीबी कारवाईमुळे पोलिस आयुक्त संतप्त झाल्याची बाब बैठकीतून बाहेर आली, दरम्यान शुक्रवारी सायंकाळीच त्यांनी सर्व ठाणेदार, एसीपी, डीसीपी यांची तातडीची बैठक घेतली. अशा परिस्थितीत काय करावे? असा प्रश्नच त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांपुढे मांडून त्यांचे मत घेतले. दरम्यान, शनिवारी पोलिस आयुक्तांनी आठ दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या विशेष दहा पथकासह गुन्हे शाखेच्या पाच पथकांना सूचना देण्यासाठी बोलावले होते. यावेळी त्यांनी पंधरा पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.क्राईम ब्रँचच्या पाच पथकांच्या तुलनेत ठाण्यांचे काम समाधानकारक आहे.
बातम्या आणखी आहेत...