आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Man Suicide Attempt At Yawatmal Police Station

यवतमाळ : पोलिस मुख्यालयाच्या परिसरातच पोलिसाचा अात्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - एका पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस मुख्यालयाच्या परिसरातच विषारी औषध प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी घडली. या पाेलिसाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. त्यांनी हा टाेकाचा निर्णय का घेतला, त्याची माहिती मात्र अद्याप कळू शकलेली नाही.

उत्तम उलगुंडे (वय ५२ वर्षे रा. पळसवाडी) हे यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते पोलिस मुख्यालयात आले होते. अचानक त्यांनी सोबत अाणलेल्या बाटलीतील विष प्राशन केले व क्षणार्धात ते जागेवरच कोसळले. इतर पाेलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने उत्तम यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.