आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळेगाव दशासर ठाणेदाराने कोतवालास केली मारहाण, कोतवाल संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी मंजूर अहवालावर तळेगाव दशासर येथील ठाणेदारांची स्वाक्षरी घेण्यासाठी गेलेल्या कोतवाल ज्योतीराम शिंदे यांना मारहाण केल्यामुळे तालुक्यात तलाठी कोतवाल संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तलाठी कोतवाल संघटनांनी याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या असून शिंदे यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. 
 
धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील बाजीराव डोमाजी घाटोळे (वय ७०) या शेतकऱ्याने फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. प्रशासकीय चौकशीनंतर घाटोळे यांचे कुटुंबीय शासकीय मदतीसाठी पात्र ठरले. मंजुर आर्थिक मदतीच्या अहवालावर स्थानिक सरपंच, संबंधित पोलीस स्टेशनचे ठाणेदार , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी संबंधित विभागाचे पंचायत समिती सदस्याच्या स्वाक्षरी आवश्यक असल्याने तलाठी आरती डकरे यांच्या सांगण्यावरुन सप्टेबर रोजी या अहवालावर स्वाक्षरी घेण्याकरिता कोतवाल ज्योतीराम शिंदे हे तळेगाव दशासर पोलीस स्टेशनमध्ये गेले. यावेळी ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी कोणतीही चौकशी करता अश्लील भाषेत बोलून ज्योतीराम यांना मारहाण केली मध्यरात्रीपर्यंत बसवून ठेवले. याबाबतची तक्रार शिंदे यांनी तहसीलदारांकडे केली. 

या घटनेनंतर तालुक्यातील कोतवाल संघटनेने संताप व्यक्त करून तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठाणेदार उपाध्याय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, शासकीय कामासाठी आल्याच्या कारणावरून अरेरावीची भाषा केल्याच्या कारणावरून ठाणेदार उपाध्याय यांनी शिंदे यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये कलम ११०, ११७ अन्वये गुन्हे दाखल केले आहे. कोणताही गुन्हा नसताना शासकीय कामासाठी गेलेल्या कोतवालास असभ्य वागणूक देऊन मारहाण केल्याने तालुक्यातील कोतवालांमध्ये संताप व्यक्त केला जात असून ठाणेदार उपाध्याय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोतवाल संघटनेकडून करण्यात आली. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष अवधूत पिंपळे, सचिव राहुल तायडे, उपाध्यक्ष भालचंद्र गोंडाने, विरेंद्र घाटे, विकास ठाकरे, अजय नेरकर, ज्योतिराम शिंदे, विपुल राळेकर, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. दरम्यान गुरुवारी तलाठी संघटनेकडूनही तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तलाठी-मंडळ अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष गोपाल नागरीकर, किशोर जऱ्हाड, दिनेश ठाकरे, भारत चिकाटे, अमोल श्रीखंडे, एस. एस. रघुवंशी, के. एस. आडे, ए. व्ही. डकरे, जी. आर. उईके आदी उपस्थित होते. 
 
काम कसे करायचे?
या प्रकरणाबाबत धामणगाव रेल्वे कोतवाल संघटनेचे तालुका उपाध्यक्ष भालचंद्र गोंडाने म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाला लाभ मिळावा यासाठी कोतवाल शासकीय काम घेऊन ठाण्यात गेले होते. त्यामुळे त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणे हे योग्य नाही.यापुढे आम्ही काम कसे करायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 
कोतवालाला मारहाण करणे चुकीचे 
महसूल विभागातील तळेगाव येथील कोतवाल ज्योतिराम शिंदे हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे काम घेऊन गेले होते. स्वतःच्या वैयक्तिक कामाकरिता पोलिस स्टेशनला गेले नव्हते. त्यामुळे त्यांना अभद्र भाषेत बोलून मारहाण करणे चुकीचे आहे. याबाबत कोतवाल संघटनेची तक्रार प्राप्त झाली असून वरिष्ठांचा मार्गदर्शनावरून पुढील कार्यवाही करू. 
- स्वप्नाली डोईफोडे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे 
 
मारहाण केली नाही 
७ सप्टेंबरच्या सुमारास मी स्वतः स्टेशनच्या आवारात मैदानात बसलो असताना कोतवाल ज्योतिराम शिंदे हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रकरण घेऊन आले. त्यावेळी मी त्यांना शासकीय पंचनाम्यावर सही करायला बोलावले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून जे होईल ते करून घ्या असे म्हटले. त्यानंतर मी त्यांना कोणतीही मारहाण केलेली नाही. शिंदे यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. 
- गोपाल उपाध्याय, सहायक पोलिस निरीक्षक, तळेगाव दशासर
बातम्या आणखी आहेत...