आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रतीक्षा यादीतील ६० जणांचे नशीब फळफळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मार्च महिन्यात संपूर्ण राज्यात पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी संबधित घटकात ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचारी संखेच्या ५० टक्के जागा भरण्याचे शासनाचे भरतीपूर्वी आदेश होते. मात्र भरती प्रक्रिया आटोपल्यानंतर शासनाने ऑगस्ट २०१६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या पोलिसांच्या जागेपैकी ७५ टक्के जागांची भरती करावी,असे आदेश दिल्याने अमरावती शहर, ग्रामीण पोलिस एसआरपीएफच्या एकूण ९८ जागांव्यतिरिक्त प्रतीक्षा यादीत असलेल्या ६० उमेदवारांचे नशीब फळफळले आहे.
अमरावतीला शहर, ग्रामीण एसआरपीएफ या तिन्ही घटकांसाठी भरती प्रक्रिया २९ मार्चपासून सुरू झाली होती. यावेळी शहरात ३१, ग्रामीण २७ तर एसआरपीएफच्या ४० जागांसाठी भरती झाली होती. ही पदांची संख्या संबधित घटकातील ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या ५० टक्के होती. दरम्यान, नव्या नियमाने एसआरपीएफला ४० ऐवजी ६७, ग्रामीणला २७ ऐवजी ४१ तर शहरात ३१ ऐवजी ४९ पदांची भरती होणार आहे.

आणखी १९ जणांची निवड दलात होणार
^शहर पोलिसदलासाठी मार्च महिन्यात ३१ जागांची भरती झाली. आता आणखी १९ उमेदवारांची भरती प्रक्रियेमधील प्रतीक्षा यादीतून लवकरच निवड करण्यात येणार आहे. मोरेश्वरआत्राम, पोलिस उपायुक्त.

२७ नव्या उमेदवारांची यादीतून केली निवड
^भरती प्रक्रियेमधून ४० जागा भरल्या होत्या.नव्या आदेशाने त्या ४० व्यतिरिक्त आणखी २७ उमेदवारांची निवड केली. त्यामुळे आम्ही एकूण ६७ उमेदवारांची निवड केली आहे. जे.बी.डाखोरे, समादेशक, एसआरपीएफ.

^एप्रिल महिन्यात२७ उमेदवारांची निवड करून अंतिम निवड यादी जाहीर केली होती. मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे रिक्त जागेमुळे आता ७५ टक्के पदे भरण्यात आली. त्यामुळे नव्याने १४ उमेदवारांची निवड यादी आम्ही जाहीर केली. लखमीगौतम, जिल्हा पोलिस अधीक्षक.
बातम्या आणखी आहेत...