आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावटीच्या पिस्टलसह 35 जीवंत काडतूस जप्त, आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- देशी बनावट पिस्टलसह ३५ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई टोळी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री दरम्यान शहरातील मोहा बसस्थानक परिसरात केली. सागर वसंतराव दुधे वय २८ वर्ष रा. छत्रपती नगर मोठे वडगावर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला सोमवार, दि. पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आगामी सण उत्सव दरम्यान शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी जिल्हा पोलिस विभागामार्फत घातक शस्त्र बाळणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत होते.

अशातच गुरूवार, दि. ऑगस्ट रोजी शहरात एका तरूण पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून टोळी विरोधी पथक शहरातील मोहा परिसरातील बसस्थानकाजवळ सापळा रचून त्या तरूणाची दुचाकी थांबवली. दरम्यान त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिश्यात ३५ जीवंत काडतूस आणि एक बनावट पिस्टल आढळून आली. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून आरोपीकडून एक दुचाकी, ३५ जीवंत काडतूस आणि एक बनावट पिस्टल असा एकूण एक लाख ६२ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज, दि. रोजी सागर दुधे याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दि. ऑगस्टपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गिते यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली.
 
जानेवारी २०१७ ते आजपर्यंत टोळी विरोधी पथकामार्फत घातक शस्त्र बाळगणाऱ्याविरूध्द १६ कारवाया करण्यात आल्या आहे. या प्रकरणी ३१ जणांना अटक करून तीन देशी बनावट पिस्टल, ३९ जीवंत काडतूस आणि तलवार, चाकू, गुप्ती आदी घातक शस्त्र जप्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...