आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Son Along With Four Arrested In Bike Theft Case

एका पोलिस पुत्रासह चार दुचाकी चोरट्यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठ आणि कोतवाली पोलिसांपाठोपाठ गाडगेनगर पोलिसांनीही मंगळवारी रात्री तीन तर बुधवारी सकाळी एक, अशा चार चोरट्यांना तीन दुचाकी एका एलसीडीसह अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी एक चोरटा हा पोलिसाचा मुलगा असून, त्याचे वडील ग्रामीण पोलिस दलात एएसआय अाहेत. सलग तिसऱ्या दिवशी दुचाकी चोरणारी तिसरी टोळी पकडण्यात शहर पोलिसांना यश आले असून,अल्पवयीन मुलांच्या या ‘प्रतापी कारनाम्यां’ मुळे पालकवर्गामध्ये चिंता व्यक्त होत आहे.

गौरव गजानन कांबे (१९, रा. राठीनगर), पवन प्रवीण पवार (१९, रा. तिरुमाला कॉलनी) आणि सुमीत तसेच अक्षय संजय गवई (१९, जयसियारामनगर), असे गाडगेनगर पोलिसांनी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. यांच्याकडून पोलिसांना चोरीच्या तीन दुचाकी एक एलसीडी जप्त करण्यात यश आले आहे.

गौरव कांबे पवन पवार हे दोघे मंगळवारी रात्री कठोरा नाका भागात एका चोरीच्या दुचाकीने फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी गौरव पवनला ताब्यात घेतले.पोलिसांनी यापूर्वीही चोरीच्या प्रकरणात गौरव कांबेला अटक केली होती. तसेच या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यांच्यासोबत एक सुमीत नावाच्या मित्राचाही समावेश असल्याचे समोर येताच पोलिसांनी एका महागड्या दुचाकीसह बुधवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याच्या घरातून चोरीची एलसीडी जप्त केली. या तिघांनी दोन दुचाकी चोरल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. त्यापैकी एक स्प्लेंडर दुचाकी गौरव पवन या दोघांनी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील सबनिस प्लॉटमधून, तर एक महागडी आरवन फाइव्ह ही दुचाकी तसेच एलसीडी तुळजाभवानी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजूने असलेल्या एका घरातून चोरली आहे. तसेच बुधवारी (दि. २०) सकाळी अन्य एक दुचाकी चोरणाऱ्या अक्षय संजय गवई याला पोलिसांनी पकडले. दरम्यान, मंगळवारी रात्री अटक केलेल्या गौरव पवनला पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार कैलाश पुंडकर यांच्या नेतृत्वात अहमद अली, उमेश कापडे, मो. साबिर, विक्रम नशीबकर यांनी केली.

चोरीच्या एलसीडीसाठी वडिलांकडून घेतले सात हजार : पोलिसांनीपकडलेल्या चारपैकी एकाच्या घरातून पोलिसांनी एलसीडी आणि महागडी दुचाकी जप्त केली. एलसीडी घरात लावताना त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की, ही एलसीडी मी एका ठिकाणाहून जुनी विकत घेतली आहे, चांगल्या परिस्थितीतील एलसीडी आहे. यासाठी तुम्ही मला सात हजार रुपये द्या, असे सांगून त्याने चोरीच्याच एलसीडीला घामाच्या पैशातून विकत आणल्याप्रमाणे घरातही लावले आणि वडिलांकडूनच हजार रुपयेसुद्धा घेतले, असे पोलिसांनी सांगितले.

अजूनही गुन्हे उघड होण्याची शक्यता
आम्ही चार जणांना आतापर्यंत अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी एलसीडी जप्त केल्या आहेत. अजूनही त्यांच्याकडून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कैलाश पुंडकर, ठाणेदार,अमरावती.