आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीबहाद्दर पोपटाकडून ठाण्यात सर्वांचाच ‘पोपट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सत्तरवर्षीय वृद्धेला शिव्या दिल्याच्या आराेपावरून एका पोपटाला चक्क समन्स बजावून पोलिस ठाण्यात पाचारण करण्यात आले. पोपटाला त्याच्या मालकानेच शिव्या शिकवल्याची तक्रार १४ ऑगस्ट रोजी वृद्धेने चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराच्या पोलिस ठाण्यात दिली होती.

जनाबाई साखरकर यांचा सावत्र मुलगा सुरेशसोबत जमिनीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे तो शेजारी वेगळा राहतो. त्याने पोपटाला शिव्या शिकवल्या असून आपल्याला पाहताच तो त्या देतो, अशी जनाबाईंनी तीन वेळा पोलिसांत तक्रार दिली. यामुळे पाेलिसांनी जनाबाई, सुरेश व पोपटाला ठाण्यात बोलावले. तो खरेच शिव्या देतो की नाही याची खातरजमा करण्यासाठी पोपटाचा पिंजरा जनाबाईंपुढे आणण्यात आला. पण खाकी वर्दीला पाहून की काय पोपटाने सर्वांचाच ‘पोपट’ केला. पठ्ठ्याने चोचीतून चकार शब्दही काढला नाही.
वनखात्याकडे सुपूर्द
वृद्धेची तक्रार आणि पुढील वाद टाळण्यासाठी पोलिसांनी सोमवारी पोपट ताब्यात घेतला. तो वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.