आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर विद्यार्थिनीला थापड मारणारा पोलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ट्यूशनला पायदळ जाणाऱ्या एका विद्यार्थिनीची शाब्दिक छेड काढून थापड मारणाऱ्या आरोपी पोलिस शिपायाला जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी शनिवारी (दि. ३) निलंबित केले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल असलेल्या पोलिसाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
शैलेश दीपक वानखडे (२५) असे निलंबित झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. शहरातच राहणारी एक विद्यार्थिनी हर्षराज कॉलनी भागात गुरूवारी सकाळी ट्यूशनला जात असताना शैलेशने तिला थापड मारली होती.झालेल्या प्रकारानंतर युवतीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली होती. शैलेश विरुद्ध गुरूवारी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नव्हता. शनिवारी सकाळी अटकपूर्व जामिनाचे कागद घेऊन तो शहर पोलिसांकडे आला असता त्याला आयुक्तांपुढे हजर करण्यात आले. शैलेशला जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या प्रकरणात शैलेशच्या दुचाकीवर असलेला दुसरा युवक कोण? ज्या विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आली, त्यावेळी कशाने मारले, ती वस्तू पोलिसांना जप्त करायची आहे. ही माहिती घेण्यासाठी पोलिसांना शैलेशला अटक करणे आवश्यक होते मात्र पोलिस आता अटक करू शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

त्याला सेवेतून कमी करा : यासंदर्भात आम्ही विशेष पोलिस महानिरीक्षकांसाेबत चर्चा केली आहे. शैलेश वानखडेसारखे व्यक्ती पोलिस खात्यासाठी योग्य नाही. त्यामुळे त्याला खात्यातूनच कमी करावे, अशी चर्चा आम्ही विशेष पोलिस महानिरीक्षकांसोबत केल्याचे पोलिस आयुक्त मंडलिक यांनी सांगितले.

हाय कोर्टात जाणार
^शैलेश वानखडेसोबतदुचाकीवर दुसरा व्यक्ती कोण होता, त्याने कोणती वस्तू युवतीला मारली यासह अन्य माहिती घेण्यासाठी त्याला अटक करणे आवश्यक होते. दरम्यान त्याला जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. अनिलकिनगे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा.
बातम्या आणखी आहेत...