आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्या वेशातील पोलिसांचा मंगळसूत्र चाेरट्यांवर ‘वाॅच’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दुचाकीस्वार महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना लक्षात घेता अशा चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी मंगळवार जानेवारीपासून राजापेठ, गाडगेनगर, फ्रेजरपुरा या तीन ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस पोलिस मित्रांना तैनात केले आहे. याद्वारे मंगळसूत्र चोरीवर अंकुश लागवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.

मंगळसूत्र चोरी या फ्रेजरपुरा, गाडगेनगर, राजापेठ ठाण्यांच्या हद्दीतच घडल्या आहेत. चोरट्यांनी महिनाभरापासून मंगळसूत्र चोरीसाठी वापरलेला फंडा हा महिलांच्या जीवाशी खेळणाराच आहे. दुचाकीवरील महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मंगळसूत्र चोरट्याने मंगळसूत्रांवर झडप मारली, त्या वेळी बेसावध महिला मंगळसूत्र वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरून पडून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळेच पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी वाहनांची तपासणी सुरू केली होती. मात्र, त्यामधूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे आता पोलिसांनी प्रत्येक ठाण्यातील डीबी स्कॉडचे कर्मचारी, गुन्हे शाखेचे दोन पथक, पोलिस मित्र हे या तीन ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालणार आहे. मंगळसूत्र चोरट्यांना पकडण्यासाठी घटना थांबवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या विशेष गस्त पथकातील अधिकारी, कर्मचारी साध्या गणवेशात राहणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

रेकॉर्डवरील १५० गुन्हेगारांची झाडाझडती : शहरातीलप्रत्येक ठाण्यात रेकॉर्डवर असलेल्या तब्बल १५० गुन्हेगारांची पोलिसांनी यादी तयार केली असून, या यादीनुसार प्रत्येक गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात येणार आहे. हे काम गुन्हे शाखेला देण्यात आले असून, बुधवारपासून (दि. ६) त्यासाठी सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.