आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Polytechnic And Agriculture Exam Paper Issue In Amravati

‘अॅग्रीकल्चरल पॉलिटेक्निक\'चा पेपर फुटल्यामुळे केंद्रावर गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने रुरल इन्स्टिट्युटमध्ये घेण्यात आलेल्या ‘अॅग्रीकल्चरल पॉलिटेक्निक’च्या तृतीय वर्षाचा ‘फंडामेंटल्स ऑफ प्लॅन्ट प्रोटेक्शन अॅन्ड अॅग्रीकल्चर मायक्रोबाॅयलॉजी' विषयाचा पेपर शनिवारी (दि. २३) फुटल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. दरम्यान, कृषी विद्यापीठाच्या चमूने दुपारी ‘रुरल’मध्ये धाव घेऊन संबंधित प्रश्नपत्रिका जप्त केल्या आहेत. दरम्यान, या विषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने निम्न कृषी शिक्षण अंतर्गत येणाऱ्या 'अॅग्रीकल्चरल पॉलिटेक्निक'ची अंतिम परीक्षा सद्या सुरू आहे. तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शहरातील रुरल इन्स्टिट्यूट हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी नऊ ते बारा वाजेदरम्यान "फंडामेंटल्स ऑफ प्लॅन्ट प्रोटेक्शन अॅण्ड अॅग्रीकल्चर मायक्रोबाॅयलॉजी' विषयाची परीक्षा सुरू असताना काही विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका ही हस्तलिखित स्वरुपात असल्याची माहिती केंद्रावरील शिक्षकांना मिळाली. त्यावेळी शिक्षकांनी वर्गाबाहेर ठेवल्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅग तपासल्या असता एका बॅगमध्ये प्रश्नपत्रिका हस्तलिखित स्वरुपात मिळून आली. तसेच या हस्तलिखित प्रश्नपत्रिका रुरल महाविद्यालयाच्या स्वच्छता गृह अन्यत्रसुद्धा सापडल्या. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील भिलोना, सावनेर, सांगळूद, ब्राम्हणवाडा थडी आणि हातुर्णा या सहा महाविद्यालयांमध्ये अॅग्रीकल्चर पॉलिटेक्निक करत असलेले जवळपास २०० ते २५० विद्यार्थी आले होते. अंतिम वर्षाला शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना एकूण विषयांचे पेपर असून चार पेपर पूर्वी झाले असून शनिवारी पाचवा पेपर होता. हा पेपर सुरू असताना काही ठराविक विद्यार्थ्यांनी अवघ्या दीड तासातच पेपर साडवून शिक्षकांकडे दिले.

विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले ते एकमेकांच्या ओळखीचे होते. यापुर्वीच्या पेपरलासुद्धा काही वेळा अशाच प्रकारे त्यांनी लवकरच पेपर दिले होते. त्यामुळे याच परीक्षाकेंद्रावरील काही विद्यार्थ्यांना त्यांच्यावर संशय होता, असे परीक्षा केंद्रावरील अन्य विद्यार्थी सांगत होते.
गंभीर प्रकार, डीनसोबत केली चर्चा
^परीक्षाकेंद्रावरआम्हीविद्यार्थ्यांची फिजीकल तपासणी केली. त्यानंतर एका विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न हस्तलिखित असलेली एक झेरॉक्स प्रत मिळाली. ती आम्ही जप्त केली. हा प्रकार गंभीर असल्यामुळे तत्काळ कृषी विद्यापीठाला कळवले. विद्यापीठाची चमूसुद्धा येऊन गेली. तसेच डिनसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की, चौकशी समिती स्थापन करून चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. प्राचार्य अमर घारफळकर, केंद्राधिकारी,रुरल इन्स्टिट्यूट,अमरावती.

विद्यापीठाची चमू पोहोचली केंद्रावर
रुरल इन्स्टिट्यूटमध्ये झालेला हा गैरप्रकार केंद्राधिकारी प्राचार्य घारफळकर यांनी तत्काळ विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना कळवला. या गंभीर प्रकरणाचीदखल घेऊन कृषी विद्यापीठाची चमू शनिवारी दुपारीच अमरावतीत दाखल झाली होती. त्यांनी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडे आलेली जप्त केलेली हस्तलिखित प्रश्नपत्रिका सोबत नेली. तसेच हे प्रकरण विद्यापीठाच्या 'अॅक्शन कमिटी'पुढे ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रश्नपत्रिका बाहेर आलीच कशी?
विद्यापीठ ज्यावेळी एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करते, त्यासाठी त्या विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून प्रश्नांचे सेट बोलवले जातात.वेगवेगळ्या सेटमधून एक दोन प्रश्न घेतले जातात.े त्यामुळे कुण्या एका प्राध्यापकाने तयार केलेले संपूर्ण प्रश्न पत्रिकेमध्ये राहत नाही, प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने तयार करण्यात येत असल्याचे येथील कृषी तंत्रशिक्षणच्याच एका प्राध्यापकाने सांगितले आहे. अशावेळी संपूर्ण प्रश्न एकाचवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच मिळणे, हा धक्कादायक प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया प्राध्यापक विद्यार्थी वर्गामध्ये व्यक्त होत आहेत.