आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Post Defaming Chief Minister, Complain File In Police Station

मुख्यमंत्र्यांची पोस्टवर बदनामी, पोलिसांत तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या परिवारासह अमेरिकेत मजा मारीत असल्याची बदनामीकारण ‘पोस्ट’ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून फिरत आहे. ही पोस्ट खोटी असून मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारी असल्याची नागपुरातील भाजप नेत्यांनी नागपुरातील नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १ जुलै रोजी सात दिवसांच्या अमेरिका दौ-यावर गेले होते. यादरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी आणि मुलीसह असलेले एका नावेवरील छायाचित्र फेसबूक, ट्वीटर आणि व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियावरुन फिरत होते. याबाबत ‘महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत असताना मुख्यमंत्री पत्नी व मुलीसह अमेरिकेत मजा मारत आहेत.’ यासह इतर शिवराळ मजकूर फिरत होता. अमेरिका दौ-यात मुख्यमंत्री फडणवीस एकटेच गेले होते. त्यांच्यासोबत राज्य सरकारचे शिष्टमंडळ होते. त्याशिवाय सोशल मीडियावरील फोटो हे काही वर्षांपूर्वीचे गोव्यातील आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्र्यांची बदनामी करणा-यांविरुद्ध कारवाई करण्याची भाजपच्या अनुसूिचत जाती मोर्चाचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केली.