आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनासाठी दोन तास वीज वाढली; रात्रीचे झटके कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कृषिपंपांना दररोज १२ तास वीज पुरवठा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज वितरण कंपनीने बुधवार सप्टेंबरच्या रात्रीपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांची रात्रीचे ओलीत करण्यापासून सुटका झालेली नाही, कारण वीजपुरवठा १२ तास राहणार आहे, मात्र दिवसभर १२ तास वीज पुरवठा मिळणार नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच तीन दिवस दिवसा चार दिवस रात्री वीज पुरवठा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना ओलितासाठी दरदिवशी दोन तास जास्त वीजपुरवठा मिळत आहे, एवढे मात्र खरे.
पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने राज्यात दररोज सलग १२ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सहा दिवसांपूर्वी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना तातडीने देण्यात आले. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातही कृषी पंपासाठी सलग १२ तास वीज पुरवठा सुरू झाला आहे.

याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख १६ हजारांवर असलेल्या कृषी पंप धारक शेतकऱ्यांना होत आहे. जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण विजेच्या २० ते २५ टक्के वीज ही कृषीपंपांना लागते. नवीन निर्णयामुळे पूर्वीचे वेळापत्रकही बदलले असून, आता रात्री ११.३० ते सकाळी ११.३० आणि सकाळी ११.३० ते रात्री ११.३० असे नवीन बारा-बारा तासांचे वेळापत्रक केले आहे. वीज पुरवठा करताना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजे १२ तासांऐवजी तांत्रिक अडचणीमुळे दहा तासच आज वीज पुरवठा करण्यात आला तर उद्या दोन तास वाढवून १४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व अधिकार त्या-त्या परिसरातील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. दर तासाला रिडींग घेण्यात येणार असल्याने कुठे किती वीज लागत आहे, याची माहिती मिळेल.
अमरावती जिल्ह्यात सध्या जवळपास दीड ते दोन लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आहे. दोन तास वीज पुरवठा वाढला असल्यामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दिवसा पाच तास वीज पुरवठा
नव्या वेळापत्रकानुसार आता रात्री ११.३० ते सकाळी ११.३०, सकाळी ११.३० ते रात्री ११.३० असे १२ तास कृषीपंपांना वीज पुरवठा मिळणार आहे. दिवसभर नाही, मात्र सकाळी वाजता पासून सकाळी ११ वाजेपर्यंत अशाप्रकारे पाच ते साडेपाच तास सिंचनासाठी वीज पुरवठा मिळू शकतो. पूर्वी मात्र सकाळी ९.३० वाजताच वीजपुरवठा खंडीत व्हायचा. यापूर्वी सिंचनासाठी दिवसाला सरासरी आठ ते दहा तासच वीज पुरवठा मिळत होता.

^मुख्यमंत्र्यांनी दिलेल्याआदेशाप्रमाणे जिल्ह्यात कृषी पंपासाठी दरदिवशी १२ तास वीज पुरवठा देण्यात येत आहे. रात्री ११.३० ते सकाळी ११.३० आणि सकाळी ११.३० ते रात्री ११.३० असे नवीन बारा-बारा तासांचे वेळापत्रक तयार केले आहे. जिल्ह्यात लाख १६ हजार कृषी पंप आहेत. अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता.
बातम्या आणखी आहेत...