आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाविरुद्ध प्रत्यक्ष कृती करा; विहिंप नेते प्रवीण तोगडियांची नरेंद्र मोदींवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. देशाबाहेर दहशतवादावर बोलायचे आणि देशात प्रत्यक्ष कृती करायची नाही, या शब्दांत विहिप नेते डॉ.प्रवीण तोगडिया यांनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका केली.

केंद्र सरकारने आता शब्दांचे खेळ बंद करुन जिहादी दहशतवाद संपविण्यासाठी ठोस पावले उचलावीत. काश्मीरमध्ये केंद्राच्या अपयशी धोरणांमुळे दहशतवादी हल्ले वाढले असून अमरनाथ यात्रेवरील हल्लादेखील त्यातूनच झाल्याचा आरोप तोगडिया यांनी पत्रक काढून केला आहे. दहशतवादी कारवाया वाढत असल्याने चर्चा करणे बंद केले पाहिजे. केंद्र सरकारने वेळीच पावले उचलली नाही तर देशात जिहादी कारवाया वाढतील, असा इशारा डॉ.तोगडिया यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे. दहशतवाद्यांचे  आर्थिक स्त्रोत नष्ट करावे, त्यासाठी केंद्राने ठोस धोरण तयार केले पाहिजे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात यावे तसेच पाकिस्तान व चीनशी चर्चा बंद केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...