आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खादी उत्पादन, विक्रीचा विकास आराखडा तयार होणार : मुख्यमंत्री; गांधी जयंतीनिमित्त प्रार्थना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘खादीच्या  उत्पादनाला असलेली मोठी मागणी आणि रोजगारनिर्मिती क्षमता लक्षात घेऊन यासाठी  राज्यात खादी उत्पादन व विक्रीचा आराखडा तयार करण्यात येईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी सेवाग्राम आश्रम परिसरात बोलताना  दिली. गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन बापू कुटीतील सामुदायिक प्रार्थनेत सहभागानंतर ते बाेलत हाेते.  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार,  खासदार रामदास तडस, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत मटकर, सचिव डॉ. श्रीराम जाधव, ज्येष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी, विभागीय आयुक्त अनुपकुमार या वेळी उपस्थित होते.  
 
खादीला मागणी वाढत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांमध्ये खादी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची विनंती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आराखड्याचा निर्णय जाहीर केला.  त्यासाठी राज्य खादी  ग्रामोद्योग, खादी ग्रामोद्योग  संस्थांची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा आश्रम प्रतिष्ठानतर्फे करण्यात येईल तसेच सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत आश्रम परिसराचा विकास करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...