आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेने केला १०० स्टॉल्सचा लिलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - श्री अंबा देवी एकवीरा देवी नवरात्र महोत्सवादरम्यान राजकमल चौक ते गांधी चौक या यात्रा मार्ग दरम्यान लावल्या जाणाऱ्या एकूण १३० स्टॉल्सची आखणी महापालिकेने केली आहे.त्यापैकी शंभर स्टाॅल्सचा लिलाव बुधवारी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आला.
श्री अंबा देवी एकवीरा देवी नवरात्र यात्रा ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. या यात्रेदरम्यान यात्रा मार्गावरील जागेवर स्टॉल्स वाटप लिलाव पद्धतीने व्यावसायिकांना दिल्या जात आहे. जागा वाटपाचा लिलाव महापालिकेत बुधवारी करण्यात आला. तसेच गुरुवार २२ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी वाजेदरम्यान उर्वरित स्टॉल्सचा लिलाव केला जाणार आहे.

सदर मार्गावर दुतर्फावर ज्या व्यावसायिकांची दुकाने आहेत, त्यांनी दुकानासमोरील मोकळ्या जागेचे भाडे त्वरित बाजार परवाना विभागामध्ये भरुन जागा आरक्षित केल्या. यापूर्वी महापालिकेकडून यात्रा मार्ग राजकमल ते गांधी चौक दरम्यान दुतर्फांवर लागणारे दुकानदारांकडून भाडे वसूल केले जात होते. मात्र यावर्षी ही पद्धत बंद करण्यात अाली आहे. लिलाव प्रक्रिया सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, स्वप्नील महल्ले, अमर सिरवानी, शेखर ताकपीठे, मनोज इटनकर, हरी शेलुकर, आनंद काशिकर यांच्याकडून पूर्ण करण्यात येत आहे.
असे राहतील स्टॉल्स

आकार किंमत (रुपये)
बाय ८- ३०४०
बाय ३६४८
बाय ४२५६
बाय ४८६४
बातम्या आणखी आहेत...