आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रब्बी, उन्हाळीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना, अंतिम मुदत 1 जानेवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अमरावती - जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी उन्हाळी हंगाम २०१७-१८ मध्ये राबवण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, त्यांना नाविन्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे आणि कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हाच यामागील मुख्य उद्देश. 

 

कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत जानेवारी २०१८ असून उन्हाळी भुईमुगासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३१ मार्च २०१८ आहे. रब्बी उन्हाळी हंगामात पिके गहू (बागायती कोरडवाहू), हरभरा, करडई, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे. पीकनिहाय शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम (रुपये) गहू बागायती ४९५ रु. प्रति हेक्टर, हरभरा ३६० रु. प्रति हेक्टर, गहू कोरडवाहू ४५० रु. करडई पिकासाठी ३०० रु. प्रति हेक्टर, उन्हाळी भुईमुगासाठी ४१०.४० रु. यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ली. पुणे जिल्हा अमरावती ही कंपनी कार्यान्वित करण्यात आली आहे. पिकांचे एकूण उत्पन्न हे मागील वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली वर्ष वगळून) गुणिले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. जोखमीच्या बाबी योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढवली. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश केला आहे. (अ) पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगामुळे पिकांच्या उत्पन्नात होणारी घट. (ब) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी झाल्यामुळे होणार नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. (ड) काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान. 

 

जोखिमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित 
योजनेतप्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदारांशिवाय कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के नगदी पिकांसाठी टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. जोखिमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...