आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्य वानखेडेंच्या हत्येची पत्नी, मुलीनेच दिली सुपारी; काॅल्स डिटेल्सने लागला छडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- चंद्रपूरच्या खत्री कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोरेश्वर वानखेडे यांच्या खुनाची सुपारी त्यांची पत्नी अनिता वानखेडे आणि मुलगी सायली यांनीच दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात ५ जणांना ताब्यात घेतले आहे. अाराेपी अनिता व सायली यांच्या माेबाइलवरील काॅल्स डिटेल्सच्या तपासणीनंतर २४ तासांत या खुनाचा छडा लागला. प्राचार्य डॉ. वानखेडे यांची वागणूक चांगली नव्हती. ते अतिशय संशयी व संतापी होते. त्यांच्या या स्वभावाला कंटाळून पत्नी व मुलीने त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
 
दोघींनी काही सराईत मारेकऱ्यांशी संपर्क साधून चार लाखांची सुपारी दिली होती. यात सायलीचा मित्र शुभम सहारे याचाही सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वानखेडे हे चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात प्राचार्य होते. दररोज ते नागपूरहून चंद्रपूरला रेल्वेने जायचे.  नेहमीप्रमाणे सकाळी चार वाजता ते अजनी स्थानकाकडे निघाले असता त्यांच्यावर मारेकऱ्यांनी शस्त्राने वार केले.
बातम्या आणखी आहेत...